मुंबई, 28 डिसेंबर : त्रिपुरातील कथित हिंसाचार प्रकरणावर मालेगाव नांदेड आणि अमरावतीमध्ये हिंसाचार (amravati violence) उफाळला होता. या प्रकरणीमागे रझा अकादमीचा (raza academy) हात असल्याचा आरोप करत कधी कारवाई करणार असा सवाल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी उपस्थितीत केला होता. तर, या हिंसाचारामागे रझा अकादमी प्रत्यक्ष बंदमध्ये सहभागी नव्हती, असा खुलासा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil ) यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनात ( winter season in maharashtra 2021) आज राज्यातील कायदा सुववस्थेतबाबत दिलीप वळसे पाटील यांनी निवेदन सारद करत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी अमरावती हिंसाचाराबद्दल वळसे पाटील यांनी महत्त्वाचा खुलासा केला.
'अमरावती हिंसाचारामध्ये रझा अकादमीचा प्रत्यक्ष संबंध नव्हता. या ठिकाणी जमियत, भीम आर्मी, सारख्या संघटना अमरावतीमध्ये बंद मध्ये सामील होत्या. या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून अमरावती दंगल प्रकरणात 686 लोकांना अटक करण्यात आली आहे. समाजवार आकडेवारी मी देत नाही. राज्यात सामाजिक सलोखा राखण गरजेचं आहे, असं वळसे पाटील म्हणाले.
'पेपर फुटला हे खरं आहे. पेपर फुटीनंतर कोण जबाबदार आहे नाही याचा विचार न करता पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली आहे. गट डच्या पेपर फुटला ही माहिती राहुल यांनी दिली. यातील 93 प्रश्न टेलिग्रामअॅपवर viral झाले. पोलिसांनी आरोग्य विभागाला सूचित केले. दरम्यानच्या काळात न्यासा कंपनीने तक्रार दाखल करायचा प्रयत्न केला. तुम्ही प्रॉबेबल आरोपी असू शकत म्हणून त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही, असंही पाटील म्हणाले.
स्मिता करेंगावकर मुख्य प्रशासक यांची तक्रार दाखल करून घेतली. म्हाडाचा पेपर फुटू शकतो असं कळल्याने ती परीक्षा रद्द केली. 2018 मध्येही tet च्या परीक्षेत घोळ झाल्याचं निष्पन्न झाले. हे एव्हड्यावर थांबणार नाही, शेवटचा माणूस सापडेपर्यंत पोलीस याची चौकशी करतील, असं आश्वासही पाटील यांनी दिलं.
मी ही हमी देतो की पोलिसांच्या बदल्यांपायी 1 रुपया द्यावा लागणार नाही. कुणी माझ्यापर्यंत आलं तर कुणाचीही गय केली जाणार नाही. त्यावेळच्या sid कमिश्नरांनी वेगळ्या लोकांवर नंबर वेगळे लोक दाखवून tapping करायचा प्रयत्न केला त्याबाबत चौकशी सुरू आहे, असंही पाटील म्हणाले.
'गडचिरोली पोलिसांचा अभिनंदन करतो, 13 नोव्हेंबरला गडचिरीलो 5 नक्षलप्रमुखना ठार करण्यात आला ज्यांच्यावर 1 कोटीच बक्षीस होतं. राज्यातील जनतेला सुरक्षित वाटतंय का हे महत्त्वाचं आहे. राज्यात पोलीस 2 वर्षे कोरोनाच्या बंदोबस्तामुळे ताण आला, खून व खुण्यांचा प्रयत्न यात वाढ झाली नाही. अंमली पदार्थ म्हणजे ncb चं नाव येतं, अंमली 7729 गुन्हे दाखल अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली केली. 1 ग्राम 2 ग्राम अंमली पदार्थ मिळालं म्हणून केस केली असं नाही, या प्रकरणाचाही तपास सुरू आहे, असंही पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.