विमान प्रवासबंदी उठल्यानंतर रवींद्र गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

विमान प्रवासबंदी उठल्यानंतर रवींद्र गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

रवींद्र गायकवाड यांनी आज शिवसेना भवनावर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली

  • Share this:

08 एप्रिल : विमान प्रवासबंदी उठल्यानंतर शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज  शिवसेना भवनावर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानप्रवास बंदी कालच उठवण्यात आलीये. त्यानंतर ते आज मुंबईत आलेत. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रवींद्र गायकवाडांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर एअर इंडियाने त्यांच्यावर बंदी घातली होती. अखेर लोकसभेत शिवसेनेचे खासदार आणि मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि गायकवाडांसाठी खिंड लढवली. या लढ्यानंतर गायकवाडांवरील विमानप्रवास बंदी मागे घेण्यात आली. याकाळात शिवसेना त्यांच्या पाठिशी ठाम उभे होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 04:27 PM IST

ताज्या बातम्या