संघ परिवार करणार 4 जूनला इफ्तार पार्टीचं आयोजन

संघ परिवार करणार 4 जूनला इफ्तार पार्टीचं आयोजन

राष्ट्रीय मुस्लिम मंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संघटना मलाबार हिल येथील सह्याद्री या सरकारी गेस्ट हाऊसमध्ये कार्यक्रम होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 30 मे : राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणित राष्ट्रीय मुस्लीम मंच संघटना इफ्तार पार्टीचं आयोजन करणार आहे. सह्याद्री अतिथिगृहात येत्या ४ जूनला या इफ्तार मेजवानीचं आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मुस्लिम मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत संस्था असून मुस्लिम समाजाच्या विविध प्रशनावर ही संघटना काम करत असते.

गेल्या काही वर्षांपासून हा मंच इफ्तार पार्टीचं आयोजन करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कट्टर प्रतिमा बदलण्यासाठी इफ्तारच्या माध्यमातून संघ प्रयत्न करत असतो.

संघाचे नेते इंद्रेश कुमारही  उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री अतिथिगृहात यापूर्वी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं नसल्याची माहिती आहे. ३० इस्लामिक देशातील वकिलातींचे अधिकारी आणि मुस्लिम समाजातील उच्चपदस्थांना कार्यक्रमासाठी निमंत्रण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2018 01:09 PM IST

ताज्या बातम्या