मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'रश्मी वहिनी तुम्ही सुसंस्कृत आहात, त्यामुळे...' 'सामना'तील टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचं संपादकांना पत्र

'रश्मी वहिनी तुम्ही सुसंस्कृत आहात, त्यामुळे...' 'सामना'तील टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचं संपादकांना पत्र

चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरेंना सामनात त्यांच्यासाठी वापरलेल्या भाषेबाबत आक्षेप घेणार पत्र लिहिलं आहे..,वाचा काय लिहिलंय त्या पत्रात...

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 2 जानेवारी : ‘सामना’ तून सातत्याने गलिच्छ भाषेत लिखाण केले जात असल्याने आपण संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. त्यानुसार त्यांनी रश्मी ठाकरेंना पत्र पाठवल्यांची माहिती चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) दिली.

औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरास काँग्रेसचा विरोध असल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पाटील यांनी केली होती. त्यानंतर पाटील यांच्याबाबत सामनातून गलिच्छ भाषा वापरली गेली होती. त्यावरुन पाटील यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackray) यांनी पत्र लिहून आपले मत व्यक्त केलं. यामध्ये पाटील यांनी लिहिलं की, 'मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही सुसंस्कृत आहात. त्यामुळे तुम्हाला ही भाषा आवडत नसेल. पण ती भाषा तुम्हाला आवडत असेल तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा. सामनात जे जे लिहिलं जात त्याला तुमची सहमती आहे असं होतं. सहमती असेल तर माझी काही हरकत नाही, असंही पत्रात म्हटलं आहे.

या पत्रावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना कंम्प्टेंट असं रुप दिलं आहे. सामना आम्ही नेहमीच वाचतो, आमच्यावरी टीकेशिवाय त्यात फार काही नसतं. या प्रकरणावर संजय राऊत घाबरत नाही असं म्हणाले होते, पण ते रश्मी वहिनींना घाबरत नाहीत, असे म्हणत असावेत; असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांमध्ये नामांतरावरुन वाद सुरू आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध केल्यानंतर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. आता या वादात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही उडी घेतली आहे. आणि नामांतर झालेच पाहिजे अशी मागणी केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर व्हावे, ही आमची मागणी होती. संभाजीनगर नामकरण हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शुक्रवारी म्हणाले होते.

First published:

Tags: Chandrakant patil, Udhav thackarey