मुंबई, 30 एप्रिल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांच्या पत्नी आणि दैनिक सामनाच्या (Samana) संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray यांना कोरोनाची लागण झाली होती. पण, आता उपचाराअंती त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 30 मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आता कोरोनाग्रस्तांना दिलं जाणार हे औषध? रुग्ण लवकर बरा होत असल्याचा कंपनीचा दावा
आज संध्याकाळी त्यांना HN रिलायन्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रश्मी ठाकरे या हॉस्पिटलमधून वर्षा निवास्थानी परत आल्या आहेत. त्यांची तब्येत सध्या चांगली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्याला मिळाले नवे गृहमंत्री, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पदभार!
23 मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
रश्मी ठाकरे यांनी थोडे दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव यांच्याबरोबर कोरोनाची लससुद्धा घेतली होती. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काही दिवस होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. अखेर उपचाराअंती रश्मी ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.