मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'रश्मी शुक्लांनी समोरून माफी मागितली आणि पाठीत सुरा खुपसला', जितेंद्र आव्हाडांची धक्कादायक माहिती

'रश्मी शुक्लांनी समोरून माफी मागितली आणि पाठीत सुरा खुपसला', जितेंद्र आव्हाडांची धक्कादायक माहिती

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे.

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे.

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे.

मुंबई, 24 मार्च : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग कोणत्या आधारावर केला? त्यांना कोणी परवानगी दिली ? या मागे कोणाचं डोकं आहे, याचा तपास करा? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

फोन टॅपिंग समोर आल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय झाला त्यावेळी रश्मी शुक्ला यांनी माफी मागितली होती.  'माझी चूक झाली, माझ्या पतीचं निधन झालं आहे, मला माफ करा अशा पद्धतीन रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्री यांच्याकडे माफी मागितली. गृहमंत्री यांनीही मोठ्या मनाने त्यांना माफ केले. त्याचा रश्मी शुक्ला यांनी गैरफायदा घेतला, असं आव्हाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हे ही वाचा-भाजप पाठोपाठ मनसेही राज्यपालांच्या दारी; सरकारमधील आणखी एक मंत्री निशाण्यावर

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

रश्मी शुक्ला पत्रावरून गदारोळ झाला आहे आहे. कोणाचाही फोन टॅप करताना त्यांना सचिवांची परवानगी लागते. रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेतली होती का ? सीताराम कुंटे यांनी याला नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी आपल्या काळात खोटे प्रयोग केले. फोन टॅप करणे हा गुन्हा आहे.

केंद्र सरकारने काही नियम दिले आहे ते पाळले का? हे सगळे प्रकार रश्मी शुक्ला यांनी केल्यात त्या गोष्टी चुकीच्या. तुम व्हॉट्सअॅप पे बात मत करो अस तिने मलाही सांगितलं होतं. लॅन्ड लाईन वर कॉल करा अस सांगितलं होतं.

आज कॅबिनेटमध्ये याची चर्चा झाली आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. रश्मी शुक्ला आणि जैस्वाल यांचं पत्र म्हणजे उंदराला मांजर साक्ष झाल्यासारखं

First published:
top videos

    Tags: Jitendra awhad