मुंबईत महिलेवर बलात्कार करून 'तसले' फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल!

मुंबईत महिलेवर बलात्कार करून 'तसले' फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल!

महिलेवर बलात्कार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनविण्यात आली. नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पीडितेची बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट- महिलेवर बलात्कार करून त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनविण्यात आली. नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पीडितेची बदनामी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक रामू कुशाले (वय-40) असे आरोपीचे नाव असून त्याला डी.एन. नगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी बॉलीवूड अभिनेत्याच्या बहिणीच्या घरी ड्रायव्हर असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आरोपी आणि पीडित महिला डी.एन. नगर परिसरातच राहतात. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच त्या स्थितीत त्याचे व्हिडीओ बनवत नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याविरोधात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून डी.एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

युवकाने केला कुत्रीवर बलात्कार...

नवी मुंबई भागात एका युवकाला भटक्या कुत्रीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 'पीटा' या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीने प्राणी कार्यकर्ते विजय रंगरे या प्रकरणात पोलिसांता तक्रार दाखल केली आहे. तर यापूर्वीही आरोपीने व्यक्तीने अनेक प्राण्यांसह असं कृत्य केल्याचा आरोप संस्थेकडून करण्यात आला आहे.

आरोपी हा खारघर परिसरात राहणारा व्यक्ती आहे. बलात्काराचं हे प्रकरणदेखील याच परिसरात घडलं आहे. आरोपीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 377 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 377 नुसार एखाद्या प्राण्याबरोबर माणसानं बलात्कार करणं हा गुन्हा आहे आणि यासाठी दोषी व्यक्तीला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

मानसोपचार तज्ज्ञांचा म्हणण्यानुसार प्राण्यांसह बलात्कार करणारा व्यक्ती हा मानसिकरित्या डिस्टर्ब असतो. त्याला प्रचंड मानसिक तणाव असतो. तर खारघरमधील कुत्र्यावर बलात्काराचा व्हिडिओ हा स्वातंत्र्यदिनी व्हायरल करण्यात आला होता. त्यावर कारवाई करत खारघर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर अ‍ॅनिमल अ‍ॅक्टिव्हिस्ट विजय रंगरे यांनी आरोपी व्यक्तीचा शोध घेत त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. एनबीटी या वृत्तवीहिनीने यासंबंधी वृत्त दिले आहे.

विजय रंगरे यांनी पीडित कुत्रीचादेखील शोध घेतला. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय तपासणी अहलावानुसार, कुत्रीवर बलात्कार झाला असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे आरोपी व्यक्तीस 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर पालकांमध्ये आणि तरुणाईमध्ये भीतीचं वातावरण आहे.

'फक्त डोळ्यांनी पाहून इमारती ठरवल्या धोकादायक', पोलखोल करणारा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2019 09:38 AM IST

ताज्या बातम्या