मुंबई गॅंगरेप: राष्ट्रवादीचे आंदोलन वादाच्या भोवऱ्यात, बॅनरवर लिहिलं असं

मुंबई गॅंगरेप: राष्ट्रवादीचे आंदोलन वादाच्या भोवऱ्यात, बॅनरवर लिहिलं असं

राष्ट्रवादीने पोलिस स्टेशन आणि आजुबाजुच्या परिसरात पोस्टर्स, बॅनर लावले होते. आता हेच पोस्टर्स, बॅनर डोकेदुखी बनले आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट: मुंबई गॅंगरेपप्रकरणी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावर उतरलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस आता स्वत: वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जालना येथील एका तरुणीवर मुंबईतील चुनाभट्टी भागात झालेल्या कथित सामूहिक बलात्कारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात पोलीस आणि सरकार विरोधात राष्ट्रवादीने मोर्चा काढत आंदोलन केले. राष्ट्रवादीने पोलिस स्टेशन आणि आजुबाजुच्या परिसरात पोस्टर्स, बॅनर लावले होते. आता हेच पोस्टर्स, बॅनर राष्ट्रवादीचा डोकेदुखी बनले आहेत. बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादीने आपला प्रचार तर केलाच सोबतच बलात्कार पीडितेचे नावही प्रसिद्ध केले आहे.

आता या मुद्द्यावरून भाजपने राष्ट्रवादीला घेरले आहे. बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करून राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनचे उल्लंघन केले आहे, असा आरोप भाजपने केला आहे.

दरम्यान, चुनाभट्टी भागात दीड महिन्यापूर्वी तरुणीवर गॅंगरेप झाला होता. नराधमांनी पीडितेला ड्रग्जही दिले होते. अखेर बुधवारी (28 ऑगस्ट) पीडितेचा मृत्यू झाला. आरोपी अद्याप मोकाट आहे. एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

पीडितेची मृत्यूसोबतची झुंज अखेर संपली..

मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केलेल्या 19 वर्षीय पीडित तरुणीची मृत्यूसोबतची झुंज अखेर संपली. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान नऊ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त होत आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी 19 वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भावाकडे राहण्यासाठी आली होती. 7 जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असं घराबाहेर पडली. पण त्यावेळी 4 नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्या दिवसापासून पीडित तरुणी मरणयातना भोगत होती. बलात्कारामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. तिच्यावर औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण सकाळच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.

ज्यावेळी बलात्काराची घटना घडली तेव्हा पीडित तरुणीने घाबरून कोणालाही यासंदर्भात माहिती दिली नाही. पण तिच्या वागण्यातला बदल आणि तिची प्रकृती नाजूक होत चालल्याचं लक्षात घेत तिला 23 जुलैला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर याबद्दल पीडितेच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली.

पीडितेच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेत तिची विचारपूस केली असता तिने 4 जणांनी बलात्कार केल्याची माहिती दिली. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी चेंबूरमधील पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीला या सगळ्याचा मोठा धक्का बसला होता. ती कोणत्याही वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत नव्हती.

डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली आणि तिचा मृत्यू झाला. घरातल्या तरुण मुलीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे तिच्या घरच्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर तिच्या जाण्यावर संपूर्ण गावातून शोक व्यक्त केला जात आहे.

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

Published by: Sandip Parolekar
First published: August 31, 2019, 8:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading