अमित शहांचा निरोप घेऊन दानवे राणेंच्या घरी !

अमित शहांचा निरोप घेऊन दानवे राणेंच्या घरी !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं.

  • Share this:

28 आॅगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. रावसाहेब दानवे हे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा निरोप घेऊन राणेंकडे गेले होते अशी माहिती सूत्रांनी दिलीये.

"गणरायावर माझी निस्सीम भक्ती आहे म्हणून मला शक्ती मिळते. मला जे जे हवं ते गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आजपर्यंत मिळालं आहे आणि यापुढेही मिळत राहील. यावेळीही ते मिळेल पण पात्र वेगळी असतील असं सूचक वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा भाजपप्रवेशाच्या चर्चेला उधाण आलंय. भरातभर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नारायण राणे यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं होतं.

रविवारी रात्री उशिरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नारायण राणेंची भेट घेतली. रावसाहेब दानवे नारायण राणेंच्या निवासस्थानी राणेंच्या घरगुती गणपतीचं दर्शन घेतलं. अमित शहांचा संदेश घेऊन ते राणेंकडे गेले होते. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर अमित शहांचा निरोप घेऊन दानवे राणेंच्या भेटीला गेले होते अशी माहिती सूत्रांनी दिलीये. त्यामुळे अमित शहांनी कोणता निरोप पाठवला होता याबद्दल राजकीय चर्चा सुरू आहे.

First published: August 28, 2017, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading