Home /News /mumbai /

BREAKING : सावरकरांच्या वारसाला मिळणार आमदारकी, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजित सावरकरांना संधी?

BREAKING : सावरकरांच्या वारसाला मिळणार आमदारकी, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजित सावरकरांना संधी?

 स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी भाजप सावरकरांच्या वारसाचा राज्यपाल नियुक्त आमदारकी देणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी भाजप सावरकरांच्या वारसाचा राज्यपाल नियुक्त आमदारकी देणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी भाजप सावरकरांच्या वारसाचा राज्यपाल नियुक्त आमदारकी देणार आहे.

    मुंबई, 06 जुलै :शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता नव्याने निर्णय घेतले जात आहे.  गेल्या दीड वर्षांपासून रखडेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची (Governor appointed MLA) यादी आता नव्या सरकारमध्ये निकाली निकाली निघणार आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्यासाठी भाजप सावरकरांच्या वारसाचा मोधी संधी देणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वारस रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीने घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली जात आहे. तर दुसरीकडे नवे निर्णय घेतले जात आहे. मविआ सरकारने पाठवले राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आता नव्याने तयार केली जात आहे.  राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत रणजीत सावरकर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. संघ आणि दिल्लीतील नेत्यांची रणजित सावरकर यांच्या नावाला पसंती दिली आहे. रणजित सावरकर यांना संधी देऊन हिंदुत्व अधिक बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.  तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी देखील या नावाला सहमती देतील अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.  विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकारकडून 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली होती. पण, दीड वर्ष झाले तरी राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. मविआ सरकार कोसळल्यानंतर शिंदे सरकारने आता राज्यपालांची यादी पुढे केली आहे. कोण आहेत रणजीत सावरकर? व्यवसायाने रणजित सावरकर इंजिनियर आहेत. सुरुवातीला त्यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहाय्यक प्रबंधक म्हणून काम केले. आपद व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी यांच्यात थेट व्हिडीओ संपर्क व्हावा यासाठी स्थापन केलेल्या उपग्रह संपर्क यंत्रणेच्या संरचनेत त्यांचा मोलाच्या सहभाग होता. रणजित सावरकर यांनी 'सावरकरस्मारक डॉट कॉम' या संकेतस्थळाची निर्मिती केली. त्यावर सावरकरांचं मराठी आणि इंग्रजी साहित्य निःशुल्क उपलब्ध आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेले सावरकर साहित्य स्मारकाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होईल. आता ब्रेल लिपीतही सावरकर साहित्य उपलब्ध आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या