S M L

शिवसेनेच्या पोस्टरला राणे समर्थकांचं प्रत्युत्तर

राणे समर्थकांनी दादरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्टर लावलंय. काल शिवसेनेनं नारायण राणेंची खिल्ली उडवणारं होर्डिंग लावलं होतं.

Sonali Deshpande | Updated On: Sep 26, 2017 01:14 PM IST

शिवसेनेच्या पोस्टरला राणे समर्थकांचं प्रत्युत्तर

मुंबई, 26 सप्टेंबर : नारायण राणेंच्या दुसऱ्या बंडानंतर आता पुन्हा एकदा शिवसेना विरूद्ध राणे असा संघर्ष पहायला मिळतोय. वरळीत  शिवसेनेनं नारायण राणेंची खिल्ली उडवणारं होर्डिंग लावले. या होर्डिंगमध्ये नारायण राणेंवर जहरी टीका करण्यात आली. साहजिकच ही टीका राणे समर्थकांनाही चांगलीच झोंबली. त्यामुळे राणे समर्थकांनीही त्याच पद्धतीनं शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय.

राणे समर्थकांनी शिवसेनेवर टीका करणारं होर्डिंग सध्यातरी सोशल मीडियावर व्हायरल केलंय. राणे समर्थकांनी दादरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्टर लावलंय. काल शिवसेनेनं नारायण राणेंची खिल्ली उडवणारं होर्डिंग लावलं होतं. त्यात राणेंबद्दल अश्लील शेरेबाजी करण्यात आली होती. याच प्रकरणी  शिवसेना नगरसेवक अरविंद भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वरळी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय.

शिवसेना विरुद्ध राणे ही पोस्टरबाजी आता चांगलीच रंगणार असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 01:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close