फडणवीसांनी 'ज्या' नेत्याविरोधात खटला दाखल केला होता, त्यालाच दिला भाजपप्रवेश

रामप्रसाद बोर्डीकर परभणी जिल्हा बँक मधील शेतकऱ्यांचा जीवन विमा घोटाळा मधील आरोपी आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 18, 2017 12:01 AM IST

फडणवीसांनी 'ज्या' नेत्याविरोधात खटला दाखल केला होता, त्यालाच दिला भाजपप्रवेश

17 मे : भाजपमध्ये अजूनही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांचं इन्कमिंग सुरूच आहे.  काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. रामप्रसाद बोर्डीकर परभणी जिल्हा बँक मधील शेतकऱ्यांचा जीवन विमा घोटाळा मधील आरोपी आहेत.

परभणी जिल्ह्यात कॉंग्रेसचे बडे नेते म्हणून रामप्रसाद बोर्डीकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. जिंतूर विधानसभेवर सलग चारवेळा ते निवडून आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाल्यावर बोर्डीकर हे या पक्षात गेले होते. परंतु तेथे त्यांचे मन रमले नाही आणि पुन्हा कॉंग्रेसमध्ये परतले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांचा फारसा करिश्‍मा चालला नाही. ते कॉंग्रेस सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. अखेर भाजपमध्ये त्यांनी आज प्रवेश केलाय.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस स्वत: विरोधी पक्षात असताना त्यांनी बोर्डीकर यांच्या विरोधात पुरावे देऊन त्यांच्यावर खटला दाखल केला होता. त्यामुळे ज्या नेत्याला जेलमध्ये पाठवायचं त्यांनाच मुख्यमंत्री यांनी प्रवेश दिल्यामुळे सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. बोर्डीकर यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाने परभणी शहरात प्रवेश बंदी लागू आहे. त्याचा खटला अजून सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 12:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...