• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • शिवसेनेचे मंत्री रामनाथ कोविंद यांच्या बैठकीला उपस्थित !

शिवसेनेचे मंत्री रामनाथ कोविंद यांच्या बैठकीला उपस्थित !

राष्ट्रपतीपदाच्या उमेदावाराने मातोश्रीवर जाण्याची परंपरा रामनाथ कोविंद यांनी पहिल्यांदाच खंडित केलीय. तरीही सेनेचे मंत्री कोविंद यांच्या बैठकीला उपस्थित होते.

  • Share this:
मुंबई, 15जुलै : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आजच्या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटायला जाणार नसले तरी शिवसेनेचे मंत्री मात्र, कोविंद यांना भेटायला थेट गरवारे क्लबवर पोहोचलेत. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्यासह शिवसेनेचे आमदार आणि मंत्रीही आवर्जून उपस्थित आहेत. गरवारे क्लबवर ढोल ताशांच्या गजरात स्वागत कोविंद यांचं स्वागत करण्यात आलं. शिवसेनेनं कोविंद यांच्या उमेदवारीला यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलंय. पण राष्ट्रपतीपदाच्या उमेदावाराने मातोश्रीवर जाण्याची परंपरा रामनाथ कोविंद यांनी पहिल्यांदाच खंडित केलीय. हेही तितकंच खरं. गरवारे क्लबवर रामनाथ कोविंद यांच्या स्वागतासाठी विनायक मेटे, महादेव जानकर हे युतीचे इतर घटक पक्ष देखील आवर्जून उपस्थित होते.
First published: