01 जुलै : मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात आता जेलबंद आमदार रमेश कदमनंही उडी घेतलीय. मला या प्रकरणात साक्षीदार बनवा, असा अर्ज त्यानं सेशन्स कोर्टात केलाय. इंद्राणी मुखर्जीनं जे आरोप केलेत, त्याचा पुनरुच्चार कदमनं केलाय.
भायखळा जेलमध्ये कैद्यांना मारहाण, लैंगिक शोषण झालं नाही असा एकही दिवस नाही, असा आरोप त्यानं केलाय. रमेश कदम यांची बहीण आणि टायपिस्टही घटनेच्या वेळी त्याच बैरेकमध्ये कैदेत होते. आता कोर्ट यावर काय निर्णय देतं, रमेश कदमला साक्षीदार बनवता का, हे पाहावं लागेल.