साकीनाका आग प्रकरण; फरसाण कारखान्याचा मालक रमेश भानुशालीला अटक

या आगीमध्ये 12 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला होता. यात भानू फरसाण कारखान्याचा मालक रमेश भानुशालीला अटक करण्यात आली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2017 10:11 AM IST

साकीनाका आग प्रकरण; फरसाण कारखान्याचा मालक रमेश भानुशालीला अटक

मुंबई, 19 डिसेंबर : काल पहाटे मुंबईच्या साकीनाका भागात फरसाणच्या दुकानाला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 12 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला होता. यात भानू फरसाण कारखान्याचा मालक रमेश भानुशालीला अटक करण्यात आली आहे.

भानू फरसाण मार्टमध्ये अनधिकृत बांधकामे करून भट्टी सुरू करणे, तसेच सुरक्षेची कोणतीच उपाययोजना न करणे, त्यामुळे 12 कामगारांचा मृत्यू ओढवणे, असे महत्त्वाचे गुन्हे रमेश भानुशालीवर आहेत. त्यानुसार पोलिसांनी ही अटक केली आहे.

या भागात हे एकच दुकान नाही तर अनेक बेकरीही आहेत. कमी जागेत जास्त दुकानं बसवायची म्हणून सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत.

मुंबईत गेल्या काही दिवसांत आग लागण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यात अशा प्रकारे अनधिकृतरित्या चालवल्या जाणाऱ्या दुकानांवर सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...