• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • रामदास कदम अडचणीत; विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेकडून नव्या उमेदवाराचा शोध सुरू

रामदास कदम अडचणीत; विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेकडून नव्या उमेदवाराचा शोध सुरू

कथित ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम अडचणीत; आमदारकीसाठी शिवसेनेकडून पुन्हा संधी नाही?

कथित ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम अडचणीत; आमदारकीसाठी शिवसेनेकडून पुन्हा संधी नाही?

Ramdas Kadam in trouble: शिवसेना नेते रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर आता त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

  • Share this:
मुंबई, 19 ऑक्टोबर : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्याविरोधात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये आता रामदास कदम यांचं नेतृत्व राहतं की जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. रामदास कदम हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांची विधान परिषदेची (MLC) मुदत जानेवारी 2022 ला संपतेय, त्यांचे सदस्यत्व पुढे कायम ठेवलं जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसेच रामदास कदम यांच्या जागी नव्या चेह-यांच्या शोध सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्यांचा पक्षाला उपयोग होईल, जो तळागाळात लोकांशी संपर्कात असेल आणि जो पक्षाच्या नियमावलीच्या पुढे जाणार नाही. अशा उमेदवारांची सध्या शिवसेना चाचपणी करतेय. त्यात मुंबईचे काही विभागप्रमुख किंवा युवा सेनेच्या पदाधिका-यांची सुद्धा वर्णी लागू शकते अशी सूत्रांची माहीती आहे. रामदास कदमांसाठी ठाण्यात बॅनरबाजी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना रसद पुरवण्याबद्दल ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम वादात अडकले आहे. तर दुसरीकडे रामदास कदम यांच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण, या बॅनरवरून शिवसेनेचा उल्लेख टाळण्यात आल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ठाण्यातील नितीन कंपनीच्या चौकात रामदास कदम यांचा फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर रामदास कदम यांचा फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरवर स्थानिक शिवसेना नेत्यांचे फोटो आहे. पण शिवसेनेचा उल्लेख टाळण्यात आला आहे. तर ‘कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक... आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन देतो बाप बापच असतो…’ असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. या मजकुरामधून कदम यांच्या समर्थकांनी कुणाला इशारा दिला अशी चर्चा रंगली आहे. दसरा मेळाव्यापूर्वी उद्धव ठाकरेंना पत्र कथित ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम दसरा मेळाव्यासाठी उस्थित राहणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मेळाव्यापूर्वी रामदास कदम यांनी उद्धव टाकरेंना एक पत्र लिहिलं. गेले 3 महिने रामदास कदम आजारी आहेत. त्यांना डाँक्टरांनी गर्दीत न जाण्याचं आणि विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम षण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यास उपस्थित राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या आवाजाची एक कथित आँडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यात ते भाजप नेते किरीट सोमय्या यांना परीवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे देण्यासंदर्भात खेड मधील स्थानिक कार्यकर्त्यांशी फोन वरून संवाद साधत आहेत. या कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेत मोठं वादळ निर्माण झालं होतं. त्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या दसरा मेळाव्यास शिवसेना नेते रामदास कदम उपस्थित रहाणार की नाही यावर मोठी चर्चा राजकिय वर्तुळात सुरू होती. पण प्रकृतीचं कारण देत ते मेळाव्याला उपस्थित राहिले नाहीत. दरम्यान रामदास कदम यांना शिवसेनेने मेळाव्यास प्रवेश दिला नाही की रामदास कदम यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली यावरुन आता विविध चर्चा रंगल्या होत्या.
Published by:Sunil Desale
First published: