‘मध्यप्रदेशातला सत्तेचा ‘व्हायरस’ महाराष्ट्रात येणार, महाआघाडीचं सरकार जाणार’

‘मध्यप्रदेशातला सत्तेचा ‘व्हायरस’ महाराष्ट्रात येणार, महाआघाडीचं सरकार जाणार’

'कोरोना' व्हायरसला 'गो' असं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? ये असं म्हणू का?

  • Share this:

मुंबई 12 मार्च :  आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात आठवले यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल केला. भाजपने तीन नेत्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. यात रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले आणि डॉ. भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी दिल्याबद्दल आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा यांचे आभार मानले. कोरोना व्हायरस विरोधात भारत सरकार आणि राज्य सरकार देखील नियंत्रण यासाठी प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं. मी कोरोना गो असं म्हटलं होतं. आता राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला ‘गो’ म्हणून सांगितलं पाहिजे असंही ते म्हणाले.

मध्यप्रदेशात सत्तेचा जो ‘व्हायरस’ आला आहे तो व्हायरस आता महाराष्ट्रातही येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या आधीही आठवले यांनी महाराष्ट्रात सत्ताबदल होणार असल्याचं म्हटलं होतं. महाराष्ट्रातला महाविकास आघाडीचा नेता संपर्कात असल्याचा खुलासाही त्यांनी केला होता. भाजपने दलित, छत्रपतींचे वंशज यांना संधी दिली, तसेच ओबीसींचं प्रतिनिधित्व करणारे भागवत कराड यांनाही संधी दिल्याचं त्यांनी सांगितलं. 'कोरोना' व्हायरसला 'गो' असं म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? ये असं म्हणू का? असं म्हणत त्यांनी आपल्यावरच्या टीकेला उत्तर दिलं.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यांना भाजपकडून राज्यसभेत पाठवलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत त्यांचं नाव नाही. तर भाजपने डॉ. भावत कराड यांना उमेदवारी जाहीर केलीय. भाजपच्या संसदीय मंडळाच्या मान्यतेनंतर ही यादी जाहीर करण्यात आली होती. तर विधान परिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

VIDEO : कोरोनाचा फटका, पोल्ट्री धारकांनी कोंबड्या फुकट वाटल्या; नागरिकांची झुंबड

या आधी भाजपने पहिली यादी जाहीर केली होती. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आलीय. मावळते खासदार संजय काकडे यांनाही दुसऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही हे आता स्पष्ट झालंय.

हे वाचा...

दिग्गजांना डावलत उद्धव ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदींना दिली राज्यसभेची उमेदवारी

शिवशाही बस आणि टॅक्सीनं भर रस्त्यात घेतला पेट, पाहा आगीची दाहकता दाखवणारे PHOTO

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2020 02:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading