रामदास आठवलेंची उद्धव ठाकरे आणि पवारांना साद, सुचवला भाजपसोबत येण्याचा फॉर्म्युला!

रामदास आठवलेंची उद्धव ठाकरे आणि पवारांना साद, सुचवला भाजपसोबत येण्याचा फॉर्म्युला!

रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत यावे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे, असं आवाहनच केले आहे.

  • Share this:

मुंबई, 28 सप्टेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा शिवसेना आणि भाजप युतीची चर्चा रंगली आहे. आता यात रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. रामदास आठवले यांनी शिवसेनेला थेट ऑफर देत साकडं घातलं आहे.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत यावे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे, असं आवाहनच  केले आहे.

गोपीचंद पडळकरांनी पुकारले आंदोलन, अन् नेत्यानेच केला संयोजकावर चाकूने हल्ला

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. पण, हे सरकार 5 वर्ष चालणार नाही. आमदारांची काम होत नसल्यामुळे नाराज आहे, त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. तसे झाले तर राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला आहे.

एवढंच नाहीतर रामदास आठवले यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदावरून एक फॉर्म्युलाही सुचवला आहे. 'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊन वर्ष होत आहे. त्यामुळे त्यांनी आणखी एक वर्ष मुख्यमंत्रिपदी राहावे, त्यानंतर तीन वर्ष मुख्यमंत्रिपद हे देवेंद्र फडणवीस यांना द्यावे'. जर शिवसेना भाजपसोबत आली तर फायदाच आहे.  केंद्रातमध्येही शिवसेनेला एक-दोन मंत्रिपद मिळतील, असा फॉर्म्युलाच आठवलेंनी सेनेला दिला.

सुशांत प्रकरणात छाती बडवून घेणारे आता कुठे गेले? सेनेच्या मंत्र्यांचा थेट सवाल

त्याचबरोबर कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. त्यामुळे शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा आणि एनडीएमध्ये सामील व्हावे, असं आवाहनही आठवले यांनी केले आहे.

'याआधीही भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता आली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये कमालीचे संबंध ताणले गेले होते. दैनिक सामनामधून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर अमित शहा हे मुंबईत आले होते, त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यानंतर वाद निवळला होता. आताही तसा तणाव निवळू शकतो', असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.

दरम्यान, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या भेटीवर खुलासा केला आहे. ही भेट फक्त सामनासाठी मुलाखत घेण्यासाठी होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही माहित होते, असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

...आणि विश्वास नांगरे पाटलांची मुंबईत एंट्री, पहिले घेतली शरद पवारांची भेट

तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करावे, असे कोणतेही कारण नाही आणि तशी कोणतीही चर्चा नाही. आम्हाला सरकार स्थापन करण्याची कोणतीही घाई नाही. हे सरकार स्वत:च्या कृतीने पडेल, ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्यानंतर आम्ही बघू, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Published by: sachin Salve
First published: September 28, 2020, 4:20 PM IST

ताज्या बातम्या