Breaking: रामदास आठवलेंनी जाहीर केला युतीचा फॉर्म्युला; म्हणाले...

Breaking: रामदास आठवलेंनी जाहीर केला युतीचा फॉर्म्युला; म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर: राज्यात विधानसभा निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी अशी लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र कोणता पक्ष किती जागा लढवणार याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणीच काही बोलण्यास तयार नाही. सत्तधारी भाजप आणि शिवसेना यांची युती होणार हे नक्की झाले आहे. पण दोन्ही पक्ष नेमक्या किती जागांवर लढणार याबाबतचा खुलासा अद्याप झालेला नाही. दोन्ही पक्षातील सूत्रांकडून विविध आकडेवारी समोर येत असताना रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी युतीचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेत RPIला अधिक जागा मिळाली पाहिजे, असे आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. राज्यमंत्रिमंडळात आम्हाला एक कॅबिनेट मंत्रीपद हवे असल्याचे आठवले म्हणाले. भाजपने आरपीआयसाठी 6 जागा सोडल्या आहेत. त्यामुळे निकालानंतर मंत्रिमंडळात दोन जागा हव्यात असा आठवलेंचा आग्रह आहे. याशिवाय आठवले यांनी युतीचा फॉर्म्युला जाहीर केला आहे.

वाचा-भाजपच्या 125 उमेदवारांची पहिला यादी जाहीर; 12 विद्यामान नेत्यांचा पत्ता कट, पाहा पूर्ण यादी

आठवलेच्या म्हणण्यानुसार भाजप 162 जागांवर तर शिवसेना 126 जागांवर निवडणूक लढवणार आहे. भाजप त्यांना मिळालेल्या 162 जागांमधून मित्र पक्षांना जागा देणार असल्याचे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपचाच होईल असेही आठवले यांनी सांगितले. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप-शिवसेना महायुतीत भाजप 146 जागांवर निवडणूक लढवले आणि त्यांच्या मित्र पक्षांना 9 जागा देतील याचाच अर्थ युतीमध्ये भाजपला 155 जागा मिळतील. तर शिवसेना 133 जागांवर लढेल आणि मित्र पक्षांना 9 जागा सोडतील.

Loading...

वाचा-भाजपमध्ये बंडखोरी सुरू? तिकीट न मिळण्यावरून महिला आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात

VIDEO : दुर्मीळ असा पोल्का डॉटेड झेब्रा, अंगावर नाहीत काळे पांढरे पट्टे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...