S M L

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी रामदास आठवलेंचा आज मुंबईत मोर्चा

दलित हक्कांसाठी आणि भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करावी यासाठी सरकारच्या विरोधात आता थेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उतरणार आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: May 2, 2018 08:57 AM IST

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी रामदास आठवलेंचा आज मुंबईत मोर्चा

02 मे : दलित हक्कांसाठी आणि भीमा कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करावी यासाठी सरकारच्या विरोधात आता थेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उतरणार आहेत. मुंबईत म्हाडा ऑफीस ते वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय असा आरपीआय दलित नेत्यांचा दुपारी 2 वाजता मोर्चा निघणार आहे.

केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह काही अनेक नेते यात सहभागी होणार आहेत. दुपारी दोन वाजता मोर्चा सुरू होणार आहे. गेल्या काही दिवस डॉक्टर प्रकाश आंबेडकर आक्रमक होतात, त्यातुलनेन आठवले मात्र काहीच ठोस भूमिका घेत नव्हते. पण अखेर आठवलेही आज सरकारविरोधात मोर्चा काढणार आहे.

संभाजी भिडेंना अटक करा आणि अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण करा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे. पण दरम्यान, मोर्चा आठवसे नाराज दलितांना खुश करण्यासाठी काढणार असल्याच्या चर्चांनादेखील उधाण आलं आहे.

दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव इथं दोन गटामध्ये हिंसाचाराचा भडका उडाला होता. या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची सध्या जामिनावर सुटका झालीये. मात्र, अद्यापही संभाजी भिडे यांना अटक करण्यात आली नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 08:56 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close