News18 Lokmat

मला किती दिवस सीएम करणार ?, जेव्हा आठवले मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतात...

रामदास आठवले यांनी पहिल्यांदाच मुलाखतकाराची भूमिका पार पाडली. आणि थेट मुलाखत घेतली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2017 03:43 PM IST

मला किती दिवस सीएम करणार ?, जेव्हा आठवले मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतात...

13 एप्रिल : नायक या हिंदी चित्रपटात अनिल कपूर मुख्यमंत्र्यांनी मुलाखत घेतो. त्यावेळी त्याला एका दिवसाचा मुख्यमंत्री बनवतात.आज मी तुमची मुलाखत घेत आहे मग मला किती दिवस मुख्यमंत्री करणार ? असा प्रश्न विचारला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना....आणि मुख्यमंत्री म्हणतात, तुम्ही एका दिवसाचे नाही तर तुम्ही एक दिवस अनेक दिवसाचे मुख्यमंत्री होणार अशी कोपरखळी लगावली.

दैनिक लोकमतच्या महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यात रामदास आठवले यांनी पहिल्यांदाच मुलाखतकाराची भूमिका पार पाडली. आणि थेट मुलाखत घेतली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची... आठवलेंच्या कविता आणि मुख्यमंत्र्यांच्या खुमासदार उत्तराने सभागृह अक्षरश: खळखळून हसलं. आठवलेंनी हिंदी आणि मराठी भाषेत मुलाखत घेऊन एकच धमाल उडवून दिली. मुलाखतीच्या सुरुवातीलाच  नायक या हिंदी चित्रपटात अनिल कपूरने मुख्यमंत्र्यांनी मुलाखत घेतली होती. त्यामुळे त्याला एका दिवसाचा मुख्यमंत्री करतात. आज मी तुमची मुलाखत घेत आहे मग मला किती दिवस मुख्यमंत्री करणार ? असा बाऊन्सरच टाकला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. रामदास आठवले हे अनिल कपूरपेक्षा काही कमी नाही. तुम्ही एका दिवसाचे मुख्यमंत्री होणार नाही. एक दिवस अनेक दिवसांचे मुख्यमंत्री होणार अशी कोपरखोळी लगावली.

अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, शरद पवार आणि रामदास आठवले या चार जणांमध्ये तुम्हाला कोण आवडतं ? असा सवाल विचारला असता मुख्यमंत्री म्हणता, अटलबिहारी वाजपेयींची बुद्धीमता, मोदींचं नेतृत्व आणि राजकारणात पवारांसारखं चाणक्ष्य व्यक्तिमत्व मला नेहमी प्रिय आहे. आणि रामदास आठवले यांच्या कविता आणि त्यांची मैत्री ही माझ्यासाठी मोलाची आहे अशी स्तुतीसुमनं उधळली.

युतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत कसं जमवून घेता असा थेट प्रश्नच आठवलेंनी विचारला. उद्धव ठाकरे आणि माझे चांगले संबंध आहे. निवडणुकीच्या काळात वादविवाद होत असतात. पण एकाच वेळी संबंध आणि राजकीय कारभार दोन्ही जुळून येत नाही. त्यामुळे कधीकधी तणाव निर्माण होतो अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Loading...

जर तुम्हाला मोदींनी दिल्लीत बोलावून घेतलं तर मुख्यमंत्रिपदासाठी कुणाचं नाव सुचवणार ? असा प्रश्न पूर्ण होत नाही तेच मुख्यमंत्र्यांनी रामदास आठवले यांचं नाव घेतलं. आणि सभागृहात एकच हश्या पिकली.

रामदास आठवलेंच्या कविता ऐकून मुख्यमंत्र्यांनाही कविता करण्याचा मोह आवरला नाही. तुम्ही आहात श्रेष्ठ कवी इथं आहे सगळ्याचं एकमत...एवढंच आहे लोकं आहे आणि साक्षीला लोकमत...तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो. नसेना का अर्थ अनर्थ तर असतो अरे तुम्ही काय कविता कराल...पण आणि किंवा परंतु, अशा अर्थापूर्ण शब्दांचा गुंता म्हणजे कविता नव्हे....कविता म्हणजे मनाला छेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे...अशी कविताच मुख्यमंत्र्यांनी केली.

आपणही चांगली कविता म्हटली आहे असं म्हणत देवेंद्र फडणीस आहे माझे चांगले मित्र म्हणून ते रंगवत आहे महाराष्ट्राचं विकासाचं चित्र...महायुती मजबूत करण्याचं सूत्र कारण तुम्ही आहात गंगाधररावांचे पूत्र...अशी कविताही आठवलेंनी केली.

अखेरचा प्रश्न...राजकारणात कधी कधी थापा माराव्या लागतात अमृता फडणवीस यांच्यापुढे कोणती थाप मारली असा प्रश्नही आठवलेंनी विचारला. यावर मुख्यमंत्री म्हणतात, बायकोपुढे मारलेली थाप कधीच पचत नसते. जो सांगतो बायको पुढे मारलेली थाप पचली तर तो सगळ्यात मोठा थापाड्या असतो असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी देताच एकच हास्यकल्लोळ उडाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...