मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'राहुल गांधी पतंप्रधानांना दंडा मारतील तर आम्ही त्यांना अंडा मारू'

'राहुल गांधी पतंप्रधानांना दंडा मारतील तर आम्ही त्यांना अंडा मारू'

अशा उलटसूलट वक्तव्यामुळे राहुल गांधी यांनी अमेठीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे.

अशा उलटसूलट वक्तव्यामुळे राहुल गांधी यांनी अमेठीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे.

अशा उलटसूलट वक्तव्यामुळे राहुल गांधी यांनी अमेठीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे.

    मुंबई,8 फेब्रुवारी: रोजगार मिळाले नाहीतर तर देशातले तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंड्याने मारतील, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी केले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून भाजपसह इतरांकडून टीकेची झोड उठली आहे. आता यात रिपइंचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. राहुल गांधी जर पंतप्रधानांना दंडा मारतील तर आम्ही त्यांनी अंडा मारू, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. रामदास आठवले म्हणाले, अशा उलटसूलट वक्तव्यामुळे राहुल गांधी यांनी अमेठीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे. काँग्रेसची संपुष्ठाकडे वाटचाल सुरू आहे. दंड्यापासून बचावासाठी माता-भगिनींचे आशीर्वाद संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसाममधल्या कोक्राझारचा दौरा केला. या सभेत त्यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला होता. रोजगार मिळाले नाहीतर तर देशातले तरुण पंतप्रधानांना दंड्याने मारतील, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर, मोदींनी प्रत्युत्तर दिलं. या दंड्यापासून बचावासाठी माझ्याकडे माता-भगिनींचे आशीर्वाद आहेत, असं मोदींनी सांगितलं. माझ्याकडे तुमचं सुरक्षाकवच आहे, असंही त्यांनी जनतेला उद्देशून म्हटले होते. संसदेतही मारले टोले त्याआधी मी पुढचे 6 महिने मी सूर्यनमस्कार घालून स्वत: फिट होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना राहुल गांधींना टोला मारला. देशातल्या तरुणांना रोजगार मिळाले नाहीत तर हे तरुण 6 महिन्यांत पंतप्रधान मोदींना दंड्याने मारतील, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्याला त्यांनी उत्तर दिलं. पंतप्रधानांच्या भाषणात राहुल गांधींनी आक्षेप घेतला तेव्हा मोदी म्हणाले, मी 40 - 45 मिनिटं बोलतोय पण यांना आत्ता करंट लागला. काहीजणांचं ट्यूबलाइटसारखं असतं, असाही शेरा मोदींनी मारला. 'गांधीजी तुमच्यासाठी ट्रेलर' दिल्ली विधानसभेच्या निवडणुका, CAA आणि NRC विरुद्धचं आंदोलन यामुळे पंतप्रधान काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पंतप्रधानांनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेसच्या मार्गाने गेलो असतो तर राम मंदिर आणि 370 सारखा प्रश्न हा सुटलाच नसता. ज्यांनी केवळ राजकारण करण्यासाठी असे विषय दशकांपासून तसेच ठेवले होते. तीन तलाकचा मुद्दाही त्यांनी असाच प्रलंबित ठेवला होता. जुन्या मार्गानं गेलो असतो तर परिवर्तन झालं नसतं. आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली. आम्ही निर्णयांची घाई का करतोय अशी विरोधकांना चिंता आहे. याचवेळी विरोधकांनी भाषणादरम्यान गोंधळ घातला. गांधीजी आमच्यासाठी जीवन पण तुमच्यासाठी ट्रेलर. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात नवभारतासाठीचा मार्ग दाखवला. कॉंग्रेसच्या मार्गानं गेलो असतो तर कलम 370 रद्द करु शकलो नसतो, तुमच्यासारखं काम मला करायचं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: #rahulgandhi, Pm modi, Rahul gandhi, Ramdas aathavale

    पुढील बातम्या