रामदास आठवले यांना मातृशोक

रामदास आठवले यांना मातृशोक

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या मातोश्री हंसाबाई बंडू आठवले यांचे आज सकाळी ७.३० वाजता वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.

  • Share this:

16 नोव्हेंबर, मुंबई: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या मातोश्री हंसाबाई बंडू आठवले यांचे आज सकाळी ७.३० वाजता वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.

ना.आठवले आज सकाळी दिल्लीला रवाना झाले आणि इकडे त्यांच्या मातोश्रींनी खेरचा श्वास घेतला.  दुपारी 3 वाजता वांद्रे येथील खेरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रामदास पोटात असतानाच हंसाबाईंवर पतिवियोगाची कुऱ्हाड कोसळली. पण या वज्रआघाताने डगमगून न जाता त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाला जिद्दीने शिकवून मोठे केले.

First published: November 16, 2017, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading