मुंबई, 21 जुलै : राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन राजकीय वातावरण तापले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. परंतु, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार माजिद मेमन यांनी मात्र आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला जावू नये, असं आवाहनच मेमन यांनी केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री जाणारच अशी भूमिका जाहीर केली आहे.
माजिद मेमन यांनी ट्वीटकरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे. 'कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला हजर राह्याचे की नाही? याबाबतचा ते स्वत: निर्णय घेऊ शकतील. मात्र, लोकशाही व्यवस्थेत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊ नये' असं मत मेमन यांनी व्यक्त केलं.
Uddhav Thakrey is among invitees for bhoomi pujan of Ram Temple. He may participate respecting Covid 19 restrictions in his personal capacity. The head of a secular democracy should refrain from promoting a particular religious activity..
— Majeed Memon (@advmajeedmemon) July 21, 2020
तसंच, व्यक्ती म्हणून उद्धव ठाकरे यांना धर्म पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यापासून त्यांना कोणीही रोखणार नाही. पण, महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्ष हे धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे एका पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी जाणे टाळावे, असंही मेमन म्हणाले.
काळ आला होता पण..,माळशेज घाटात कारसमोरच कोसळला भलामोठा दगड, आणि...
त्याचबरोबर मेमन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराबद्दल केलेल्या विधानाबाबतही भाष्य केलं. शरद पवार यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून निव्वळ राजकारण करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींचे प्राधान्य कशाला हवे होते? याबद्दल त्यांनी हे विधान केले होते.
उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार - राऊत
तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'राम मंदिर हा राष्ट्रीय अस्मितेचा हा मुद्दा आहे. माजिद मेमन यांचे मत मला माहिती नाही. सरकार किमान कार्यक्रमावर चालावं असं आमच्या सरकारचा आधार आहे. हा सरकारचा अजेंडा नाही' असं स्पष्ट केलं आहे.
मुंबईत महिलेला तब्बल 11 लाखांना लुटले, पद्धत पाहून पोलीसही गेले चक्रावून!
'राम मंदिर भूमिपूजनाचा शासकीय कार्यक्रम आहे. खरंतर अनेक राम भक्तांची निराशा होणार आहे. अनेक जणांना या सोहळ्याला जाता येणार नाही. अनेक नियंमांचे पालन करुन हा कार्यक्रम होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी या कार्याला गती मिळावी म्हणून प्रयत्न केला. या सरकारला 100 दिवस झाल्यानंतरही उद्धव ठाकरे जाऊन आले होते. त्यामुळे या सोहळ्याला उद्धव ठाकरे आयोध्येत जातील, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.
राम मंदिराबाबत आमच्या काहीही सूचना नाही. राम मंदिराबाबत भूमिपूजन लांबवणं योग्य नाही. एकीकडे अडवाणी यांना भूमिपूजनाला चालवणे आणि त्यांच्या विरोधातच खटला चालवणे हे विसंगत आहे. तो खटला आता बेकायदेशीर आहे, असं मत राउत यांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ram Mandir, माजिद मेमन, राम मंदिर, शिवसेना, संजय राऊत