News18 Lokmat

राम कदमांची प्रवक्तेपदावरुन होणार हकालपट्टी ?

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2018 07:15 PM IST

राम कदमांची प्रवक्तेपदावरुन होणार हकालपट्टी ?

06 सप्टेंबर : 'मुली पळवून नेण्यास मदत करणार, यासाठी माझा फोन नंबर घ्या' असं वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर अखेर भाजपने कारवाई करण्याची तयारी केलीये. राम कदम अनेक वृत्तवाहिन्यांवर कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांचे प्रवक्तेपदच काढून घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.

राम कदमांच्या या विधानामुळे भाजपची प्रतिमा डागळली गेलीये. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपने पाऊल उचलणार आहे. राम कदम यांनी प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.

वादग्रस्त विधानानंतर प्रवक्ता म्हणून कोणत्याही वृत्तवाहिनीवर न जाण्याच्या राम कदम यांना पक्षाने सूचना दिलेय. पक्षाची थेट बदनामी होत असल्याने राम कदम यांचे प्रवक्तेपद काढले जाण्याची शक्यता आहे. सध्या केवळ राम कदम यांना पक्षाकडून तोंडी सूचना देण्यात आल्याचं कळतंय.

घाटकोपर इथं राम कदम दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी राम कदम यांनी तरुणांशी संवाद साधत असताना लग्नासाठी मुलगी तयार नसेल तर पळवून नेण्यास मदत करणार असल्याचं सांगत आपला मोबाईल नंबर तरुणांना दिला.

Loading...

त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय. राम कदम यांच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आलीये. पण तरीही राम कदम यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. त्यांनी दोन वेळा दिलगिरी व्यक्त केली. पण वाढत्या विरोधानंतर तब्बल 48 तासानंतर राम कदमांनी अखेर माफी मागितली.

VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2018 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...