राखीपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणांहून सोडणार ज्यादा एसटी बस

राखीपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणांहून सोडणार ज्यादा एसटी बस

या दिवशी डेपोंवर होणारी अन्य वेळेच्या गर्दीनुसार त्या मार्गांवर तातडीने बस सोडल्या जाणार आहेत

  • Share this:

राखीपौर्णिमेच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने एसटीची विशेष वाहतूक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ठाणे विभाग आपल्या ताफ्यातील शक्यतो सर्वच गाड्या रस्त्यांवर उतरवणार आहे. राज्य परिवहनच्या ठाणे विभागात एकूण आठ डेपो असून ताफ्यात एकूण ६५० बस आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी महिलावर्ग जास्त प्रमाणात बाहेर पडतो. त्यातच यंदा रक्षाबंधन हे रविवारी आल्याने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यानुसार २५, २६ आणि २८ या दिवसांत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी डेपोंवर होणारी अन्य वेळेच्या गर्दीनुसार त्या मार्गांवर तातडीने बस सोडल्या जाणार आहेत.

सर्वच मार्गांवर जास्त बसेस सोडण्याचा प्रयत्न 

रक्षाबंधनानिमित्त प्रत्येक ठिकाणी शक्य तेवढ्या जादा बस देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पण, एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी जास्त गर्दी झाल्यास त्या ठिकाणी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटी बसने प्रवास करणाऱ्यांनी या सुरक्षित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी केले आहे.

First published: August 23, 2018, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading