नर्सने पेशंटलाच बांधल्या राख्या, ठाणे हॉस्पिटलमध्ये रंगला अनोखा रक्षाबंधन सोहळा

नर्सने पेशंटलाच बांधल्या राख्या, ठाणे हॉस्पिटलमध्ये रंगला अनोखा रक्षाबंधन सोहळा

नर्सेसनी राख्या बांधायला सुरूवात केली आणि पाहता पाहता सगळं वातावरणच बदलून गेलं. कायम एकमेकांकडे कोरड्या नजरेने पाहणाऱ्यांच्या नजरेत ओलावा आला आणि चेहेऱ्यावर हसू आलं.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 15 ऑगस्ट : आजच्या धावपळीच्या जीवनात सण सोडाच, अनेकांना घरी रोज एकत्र जेवणाची पंगतही नशीबी येत नाही. या धावपळीच्या जीवनातून विविध मार्ग काढत तो क्षण जगण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. पोलीस, एस.टी.चे वाहक, चालक, अग्निशमन दलाचे कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस अशा लोकांना कायम ड्युटीवर राहावं लागतं. त्यामुळे सणा वारांना त्यांना कुटुंबात राहण्याचा आनंद मिळत नाही. त्यात डॉक्टरांचा पेशा तर आणखीच आव्हानात्मक असतो. तिथे चोवीस तास नर्सेसना अलर्ट राहावं लगातं. पण अशाही परिस्थितीत कर्तव्य पहिलं असा वसा घेणाऱ्या ठाणे हॉस्पिटलच्या नर्सेसनी हॉस्पिटलमधल्या वॉर्डमध्येच राखीपोर्णिमा साजरी केली आणि पेशंटला राख्या बांधल्या.

पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते का? सदाभाऊंचा हल्लाबोल

गुरुवारी ठाण्यात असंच अनोखं रक्षाबंधन साजरं झालं. कामावर असल्यामुळे घरी किंवा भावाकडे राखी बांधायला जाता न आल्याने आजच्या रक्षाबंधना निमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या परिचारीकांनी रुग्णालयातील रुग्णांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यांत अशा काही परिचारीका होत्या ज्यांना भाऊ नाहीये तर असे काही रुग्ण आहेत की ज्यांना बहिणी नाहीत किंवा त्या दूर गावी आहेत.

ज्या वॉर्डमध्ये कायम दु:खाची किनार असते. चेहेरे खिन्न असतात. केव्हा एकदाचं घरी जातो असं रुग्णांना आणि नातेवाईकांना वाटत असतं. नर्सेसची कायम धावपळ सुरू असते अशा वातावरणात आज थोडं वेगळेपण आलं. रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या चेहेऱ्यावर हसू फुटलं आणि डोळ्यात पाणीही आलं.

रक्षाबंधनाच्याच दिवशी बहिण भावावर काळाचा घाला, मुलीची मृत्यूशी झुंज

नर्सेसनी राख्या बांधायला सुरूवात केली आणि पाहता पाहता सगळं वातावरणच बदलून गेलं. कायम एकमेकांकडे कोरड्या नजरेने पाहणाऱ्यांच्या नजरेत ओलावा आला आणि चेहेऱ्यावर हसू आलं. अनेकांच्या डोळ्यात पाणीही आलं. हॉस्पिटलच्या रुक्ष वातावरणात डॉक्टरांनी चांगले दोन शब्द बोलले, वातावरण उत्तम असलं की पेशंट अर्धा बरा होतो असं म्हणतात आज त्याचाच अनुभव इथल्या रुग्णांनी घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 15, 2019 06:43 PM IST

ताज्या बातम्या