'एकदा कसाबही म्हणाला होता, भारत माता की जय'

राकेश मारिया यांचं Let Me Say It Now हे पुस्तक नुकतंच प्रसारित झालं आहे. त्यात त्यांनी दहशतवादी अजमल कसाबच्या बाबतीतही मोठा खुलासा केला आहे.

राकेश मारिया यांचं Let Me Say It Now हे पुस्तक नुकतंच प्रसारित झालं आहे. त्यात त्यांनी दहशतवादी अजमल कसाबच्या बाबतीतही मोठा खुलासा केला आहे.

  • Share this:
    विवक गुप्ता मुंबई, 20 फेब्रुवारी माजी IPS अधिकारी राकेश मारिया यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहेत. त्यांच्या पुस्तकात त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. 26/11च्या मुंबई हल्ल्यात जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबच्या बाबतीतही राकेश मारिया यांनी आपल्या Let me say it now या पुस्तकात अजून एक खुलासा केला आहे. चौकशी दरम्यान जेव्हा कसाबला सकाळी 4.30 वाजता रुग्णालयातून क्राईम ब्रँचच्या कार्यालयात नेलं जात होतं तेव्हा तेव्हा राकेश मारिया यांनी ताफ्यातील सर्व गाड्यांना थांबवलं आणि कसाबला बाहेर काढला. त्यानंतर त्याला गुडघ्यावर बसवून जमिनीला डोकं टेकवून भारत माता की जय असं म्हणायसला सांगितलं. पहिल्यांदा कसाब 'भारत माता' हळू आवाजात बोलला. मात्र त्यानंतर राकेश मारियांनी त्याला मोठ्याने म्हणण्यासाठी दटावलं आणि सांगितलं की सगळ्यांना ऐकायला येईल असं मोठ्यानं बोल. त्यानंतर कसाबने मोठ्यानं भारत माता की जय म्हटलं. दहशतवाद्यांना शेवटी मुंबई पोलिसांनीच दिला खांदा राकेश मारिया यांनी या पुस्तकात अजुन एक खुलासा केला आहे. तो म्हणजे जे 26/11 मध्ये मारले गेलेले दहशतवादी होते त्यांना कशा प्रकारे पोलिसांनी पूर्ण धार्मिक रिवाजाप्रमाणे अज्ञातस्थळी दफन केलं. मारिया यांनी लिहिलंय की, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना मुंबई पोलिसांनी खांदा दिला आणि एका मौलवीला बोलवून दफनविधी पार पाडला. पाकिस्तान आपल्या नागरिकांना ओळखायला नकार देत होता आणि दुसरीकडे या मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा दफनविधी पार पडत होता. त्यांना खांदा द्यायलाही शेवटी मुंबई पोलीसच पुढे आले. मारिया यांनी आपल्या Let Me Say It Now या पुस्तकात लिहिलंय की, या दफनविधीसाठी कशाप्रकारे एका मौलवीला बोलवण्यात आलं. या दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी पोलिसांनी एका अज्ञात जागेचा शोध घेतला आणि त्यानंतर तिथे एका मौलवीला बोलवण्यात आलं. मौलवीला तिथे आणताना खबरदारी घेण्यात आली. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती. दफनविधी झाल्यानंतर त्या जागेपासून दूरवर नेऊन त्या मौलवीला सोडण्यात आलं होतं. एवढ्या वर्षांनंतरही काही मोजक्या पोलीस अधिकाऱ्यांशिवाय याबाबत कुणालाही माहित नाही की मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना कुठे दफन केलं आहे. ------------------- अन्य बातम्या तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल, राज ठाकरे यांच्या मनसेचा MIM ला इशारा 'मी का माफी मागू?' वादग्रस्त वक्तव्यांवरच्या प्रश्नांना वारिस पठाणांची बगल
    First published: