राज्यसभा निवडणूक : भाजपकडून नारायण राणे आणि विजया रहाटकरांनी भरला अर्ज

विजय रहाटकर यांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2018 01:48 PM IST

राज्यसभा निवडणूक : भाजपकडून नारायण राणे आणि विजया रहाटकरांनी भरला अर्ज

12 मार्च : राज्यसभा निवडणुकीसाठी आज एनडीएमध्ये सामील झालेले महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आपला उमेदवारीचा अर्ज भरला आहे. त्यांच्यासह विजया रहाटकर यांनीही अर्ज भरला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातून सहा जागासाठी आज अर्ज भरण्याची अखेरची तारिख होती. नारायण राणे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज विधानभवनात पोहोचून आपला उमेदवारीचा अर्ज भरला. तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.

भाजपकडून केरळचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी जाहीर केलीये. तर प्रकाश जावडेकर यांची राज्यसभेसाठी पुन्हा वर्णी लागलीये.  विजय रहाटकर यांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना उमेदवारी जाहीर झालीये. केतकरांनी आज विधानभवनात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार

Loading...

वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी

डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी

रजनी पाटील  - काँग्रेस

अनिल देसाई  - शिवसेना

राजीव शुक्ला - काँग्रेस

अजयकुमार संचेती - भाजप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2018 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...