Home /News /mumbai /

शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींना संधी देताच खैरेंनी नाराजी व्यक्त करत केला गौप्यस्फोट

शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींना संधी देताच खैरेंनी नाराजी व्यक्त करत केला गौप्यस्फोट

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई, 12 मार्च : शिवसेनेनं धक्कातंत्राचा अवलंब करत राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना संधी दिली आहे. चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते असे अनेक दिग्गज या जागेसाठी स्पर्धेत असताना शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदी यांना संधी दिल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उचांवल्या आहेत. तसंच या जागेसाठी आधी चर्चेत असणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'पक्षाला प्रियंका चतुर्वेदींचं काम दिसलं, मात्र आमचं काम दिसलं नाही,' अशा शब्दांमध्ये चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसंच एक धक्कादायक दावाही केला आहे. 'याआधी मला अनेक पक्षांकडून ऑफर होत्या, मात्र मी दुसरीकडे गेलो नाही,' असं खैरे यांनी म्हटलं आहे. तसंच मी मरेपर्यंत शिवसेनेत राहणार असल्याचंही ते म्हणाले. राज्यसभेसाठी संधी मिळालेल्या प्रियंका चतुर्वेदी कोण आहेत? शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना डावलून राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक असलेल्या प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेत आल्या होत्या. त्यांचा हा प्रवेश सगळ्यांनाच धक्का देणारा होता. इंग्रजी आणि हिंदी भाषेवर उत्तम पकड आणि दिल्लीच्या उच्चभ्रू ल्युटीयन्स वर्तुळात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. त्याचबरोबर त्यांचं आदित्य ठाकरे यांच्याशी उत्तम ट्युनिंग आहे. त्यामुळे दिल्लीत शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. खडसेंना पुन्हा धक्का, राज्यसभेचा पत्ता कट, या नेत्याला मिळाली उमेदवारी शिवसेनेत राज्यसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार लॉबिंग झालं होतं. माजी खासदार चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांची नावं चर्चेत होती. मात्र या सगळ्यांना डावलत उद्धव ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदींवर विश्वास दाखवला. आदित्य ठाकरे इफेक्ट प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेतर्फे राज्यसभेची उमेदवारी मिळणं, हा आदित्य ठाकरेंचा शब्द आता पक्षात महत्त्वाचा होणार असल्याचं पहिलं मोठं चिन्हं असल्याचं बोललं जात आहे. खरंतर या स्पर्धेत शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावते होते. या दोन्ही नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेलं आहे. मात्र त्यांना डावलून चतुर्वेदी या अमराठी पण आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय महिला नेत्याला संधी देण्यात आली आहे. यावरुन खैरे नाराज आहेत. या निमित्ताने पक्षातील जुने विरुद्ध नवे असा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Chandrakant khaire, Shiv sena

    पुढील बातम्या