विवेक कुलकर्णी, मुंबई
26 एप्रिल : स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज उद्धव ठाकरे यांची त्यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास ही चर्चा झाल्याचं समजतंय. शेतकरी कर्जमाफी आणि समृद्धी महामार्ग या दोन विषयांवर राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुख्यत्वे चर्चा झाली. या दोन्ही विषयांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे.
शिवसेनेनेही यांत सहभागी व्हावं अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली. तर आम्ही शेतकरी हिताच्या बाजूचे आहोत असं उद्धव ठाकरे यांनी शेट्टी यांना सांगितल्याचं समजतंय.
शेतकरी प्रश्नांच्या निमित्ताने हे दोन पक्ष भाजपविरोधात एकत्र येतायंत असं काहीसं चित्र निर्माण होतंय. शेतकरी प्रश्नावर राष्ट्रावादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा अधिक जाण असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी नुकतच केले होतं, त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा