मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

राजनाथ सिंग फोनवर 'अस्सलाम वालेकुम' म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी केलं उघड

राजनाथ सिंग फोनवर 'अस्सलाम वालेकुम' म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी केलं उघड

राष्ट्रपती निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता.

    मुंबई, 12 जुलै : एकनाथ शिंदे  (eknath shinde ) यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेत (shivsena) खिंडार पडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांच्या बैठका घेत आहे. मागे एकदा राजनाथ सिंग (rajnath singh) यांचा फोन आला होता, त्यावेळी त्यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम म्हटलं होतं, असा खुलासाच उद्धव ठाकरेंनी (iddhav thackery)  केला. आपण भडकल्यानंतर ते जय श्रीराम म्हणाले, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीला 30 ते 35 माजी आमदार उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, राष्ट्रपती निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला होता. त्यावेळी राजनाथ यांनी फोनवर मला अस्सलाम वालेकुम म्हणून बोलण्यास सुरुवात केली. त्यांची ही भाषा ऐकून मला धक्का बसला. त्यांच्या या कृत्यावर भडकल्यानंतर ते जय श्रीराम म्हणाले, असा खुलासा खुद्द उद्धव ठाकरे यांनी केला. (शिंदे गटातील आमदाराविरोधात भाजपचे बंड; भ्रष्टाचाराबाबत ईडी-सीबीआय चौकशीची मागणी) संघर्षाची तयारी ठेवा सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचं आहे. आता आपली वारंवार बैठक  होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार आहे, असं म्हणत या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी  माजी आमदारांना तयारीला लागा असे आदेश दिले आहे. (VIDEO : राष्ट्रपती निवडणुकीच्या NDA बैठकीला दिपक केसरकरांची दिल्लीवारी) तसंच, राष्ट्रपती निवडणुकीमध्ये NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार आहोत. यापूर्वी सुद्धा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी UPA च्या उमेदवार असलेल्या आपल्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या