'महाराष्ट्रात Lockdown लागणार नाही तर...' मोदींच्या आवाहनानंतर राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

'महाराष्ट्रात Lockdown लागणार नाही तर...' मोदींच्या आवाहनानंतर राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra Lockdown updates: महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 एप्रिल: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. या संदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी म्हटलं की, राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार नाहीये तर निर्बंध आणखी कठोर (strict restrictions) करण्यात येणार आहेत.

नेमकं काय म्हणाले आरोग्यमंत्री?

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी सांगितलं असेल की, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून सांगितला असेल तरी मला असं वाटतं की, राज्यातील परिस्थिती पाहता राज्यातील कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 'ब्रेक द चेन' करुन ही साखळी तोडणार आहोत. संपूर्ण मंत्रिमंडळाने भूमिका मांडली की आपल्याला लॉकडाऊन करुन ही साखळी तोडावी लागेल. त्या अनुषंगाने आता राज्यात लॉकडाऊन हा जरी शब्द नसला तरी 'ब्रेक द चेन' नुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

वाचा: Nashik Oxygen Leak : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती; प्राणवायूअभावी 11 जणांचा मृत्यू- राजेश टोपे

या गोष्टी सुरू राहणार

मास ट्रान्सपोर्टेशन आणि अत्यावश्यक सेवा वगळता आता ज्या गोष्टी सुरू आहेत त्या बंद करण्यात येतील. बस सेवा, रेल्वे सेवा बंद राहणार नाहीये या सेवा सुरू राहतील. या संदर्भातील नियमावली लवकरच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं.

जिल्हा बंदी राहणार का?

संपूर्ण जिल्हा बंदी करण्यात येणार नाही तर कठोर नियम लागू करण्यात येणार खूपच अत्यावश्यक असेल तरच जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार. जिल्ह्याच्या सीमेवर नागरिकांना जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यामागचं कारण विचारलं जाणार अस आवश्यक असेल तर परवानगी देण्यात येईल.

Published by: Sunil Desale
First published: April 21, 2021, 2:59 PM IST

ताज्या बातम्या