Home /News /mumbai /

राजेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता

राजेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता

राजेश क्षीरसागर जर विधनपरिषदेवर गेल्यास त्यांना मंत्रिमंडळात ही स्थान मिळू शकते. चंद्रकांत पाटील हे मंत्रीमंडळाबाहेर राहणार असल्याने कट्टर हिंदुत्ववादी म्हणून कोल्हापुरातून क्षीरसागर यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते.

    मुंबई, 3 जुलै : आमदार नसतानाही एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेल्या राजेश क्षीरसागर यांना विधानपरिषदेची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या 12 जागांवर त्यांची वर्णी लागू शकते. एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी म्हणून क्षीरसागर यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याच्या माध्यमातून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष म्हणून क्षीरसागर यांनी शहरात कोट्यवधीचा निधी आणला आहे. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी न दिल्याने क्षीरसागरानी बंड केले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत काढत त्या जागेवर काँग्रेसला उमेदवारी दिली होती. Assembly Speaker Election : फडणवीसांच्या कानात सांगितलेलं तसं झालं असतं तर आज...,आदित्य ठाकरे अखेर बोलले उद्धव ठाकरे यांची ही समजूत फार काळ टिकली नाही. त्यानंतर नाराज राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. गोव्यातील हॉटेल बुकिंग करण्यात क्षीरसागर यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते त्यामुळे याचे बक्षीस म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना विधान परिषदेवर घेतील अशी कार्यकर्त्यांना अशा आहे. क्षीरसागर जर विधनपरिषदेवर गेल्यास त्यांना मंत्रिमंडळात ही स्थान मिळू शकते. चंद्रकांत पाटील हे मंत्रीमंडळाबाहेर राहणार असल्याने कट्टर हिंदुत्ववादी म्हणून कोल्हापुरातून क्षीरसागर यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. नरहरी झिरवळांबाबतचा 'तो' शब्द ठरला वादग्रस्त; टीका होताच जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण 39 आमदारांनी व्हीप मोडला, शिवसेनेकडून तक्रार दाखल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. पण, शिवसेनेनं व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली. तर शिंदे गटाकड़ून ही 16 आमदारांनी व्हीप मोडला असल्याची तक्रार दिली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याबद्दल शिवसेनेनं तातडीने उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली आहे. सेनेची तक्रार ही सभागृहाच्या पटलावर घेतली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shivsena

    पुढील बातम्या