Home /News /mumbai /

घाईघाईत रेल्वे ट्रॅक ओलांडणं दुचाकीस्वाराला भोवलं; दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO

घाईघाईत रेल्वे ट्रॅक ओलांडणं दुचाकीस्वाराला भोवलं; दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO

एका भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Shocking Accident Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल (Rajdhani Express Crushed the Bike).

  नवी दिल्ली 19 फेब्रुवारी : 'अति घाई संकटात नेई' हे वाक्य अनेकदा आपण वाचत किंवा ऐकत असतो. मात्र, प्रत्यक्षात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम म्हणजे अनेकदा रस्त्यांवर आपल्याला भीषण अपघात पाहायला मिळतात आणि बऱ्याचदा यात लोकांना जीवही गमवावा लागतो. सध्या अशाच एका भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Shocking Accident Video Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल (Rajdhani Express Crushed the Bike). वेगात सुरू असलेला पंखा हाताने थांबवला; VIDEO पाहून बसणार नाही डोळ्यांवर विश्वास या व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती रेल्वेच्या खाली येता येता वाचला. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. भरधाव वेगातील ट्रेलखाली आलेल्या या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं दिसतं. सुदैवाने वेळीच दुचाकीस्वार युवक ट्रॅकपासून थोडा दूर गेला, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. व्हिडिओमध्ये दिसतं की एक राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) रूळावर जात असते. मात्र वेळ वाचवण्यासाठी दुचाकीस्वार ट्रेन आपल्या जवळ येण्याआधीच एक्सप्रेससमोरून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात त्याची दुचाकी घसरते आणि रूळावरच कोसळते. काहीच सेकंदाच अगदी वेगात एक्सप्रेस त्याच्या जवळ येते. घाईघाईत हा युवक रूळावरुन बाजूला होतो. मात्र, त्याची दुचाकी रूळावरच राहाते. काही सेकंदातच अगदी वेगात ही एक्सप्रेस त्याच्या गाडीवरून जाते आणि गाडीचा अक्षरशः चक्काचूर होतो. सुदैवाने या घटनेत दुचाकीस्वाराचा जीव थोडक्यात वाचतो.

  Video : गर्दीच्या रस्त्यावर एकाच वेळी 2 बाईक चालवत होता तरुण; विश्वास बसत नाही?

  अशीच एक घटना मागील वर्षी जानेवारी महिन्यातही घडली होती. या घटनेत ट्रेनने दुचाकीचा चक्काचूक केला होता आणि व्यक्तीचा जीव अगदी थोडक्यात वाचला होता. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील टाईम स्टँप पाहून समजतं की ही घटना 12 फेब्रुवारीला संध्याकाळी घडली आहे. ही ट्रेन राजधानी एक्सप्रेस असून घटना मुंबईतील असल्याचं सांगितलं जात आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Shocking video viral, Train accident

  पुढील बातम्या