मुंबई, 13 जुलै : राजस्थानमध्ये सत्ता संघर्ष निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंड पुकारल्यामुळे सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र, 'राजस्थानमध्ये राजकीय भूकंप होणार नाही', असा दावा केला आहे.
पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी राजस्थानमधील राजकीय संघर्षावर आपली प्रतिक्रिया दिली.
'कोरोनाच्या परिस्थितीत अशा प्रकारचे राजकारण करण्याची मुळात गरज नाही. राजस्थानमध्ये राजकीय भूकंप घडवण्याचा प्रयत्न होत आहे. पण, तिथे असा कोणताही भूकंप होणार नाही. अशोक गहलोत हे कसलेले राजकारणातल पहेलवान आहे.' असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
राज्यातही 'ऑपरेशन कमळ' होणार? शरद पवारांनी फडणवीसांना फटकारलं
तसंच, भारतीय जनता पक्षाला आता जपून पावलं टाकावी लागेल. भाजप विरोधकांचे सरकार अस्थिर करत आहे. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.कारण राजकारण करण्याची ही वेळ नाही. अशा परिस्थितीत लोकांना कोणतेही सरकार हे स्थिर हवे आहे. त्यामुळे गहलोत सरकार पडेल अशी शक्यता नाही, असंही राउत म्हणाले.
दरम्यान, बंडाचा झेंडा हातात घेऊन उतरलेले सचिन पायलट नवी दिल्लीत ठाण मांडून आहे. पायलट हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहे. राजस्थानच्या राजकीय परिस्थितीचे पडसाद दिल्लीत उमटायला सुरुवात झाली आहे.
उद्धव ठाकरेंची फक्त एक सवय शरद पवारांना खटकते, जाहीरपणेच केलं भाष्य
तर दुसरीकडे, काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून या बैठकीनंतर भाजप पावलं उचलणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज आयोजित केली आहे. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. सचिन पायलट विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस उपस्थित न राहिल्यास पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्याची शक्यता आहे.
राजस्थान राजकीय नाट्य
पक्षीय बलाबल
काँग्रेस 107
भाजप 72
अपक्ष 13
राष्ट्रीय लोक दल 1
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष 3
सीपीएम 2
भारतीय ट्रायबल पक्ष 2
काँग्रेस आणि अपक्ष पाठिंब्याचे सरकार
एकूण जागा 200
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.