विजया रहाटकरांचा अर्ज मागे, कुमार केतकरांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा

विजया रहाटकरांचा अर्ज मागे, कुमार केतकरांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा

विजया रहाटकर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.

  • Share this:

15 मार्च : राज्यसभा निवडणुकीतून भाजपच्या उमेदवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आपला अर्ज मागे घेतलाय. विजया रहाटकर यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यसभेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. त्यामुळे  ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा मार्ग आता मोकळा झाला.

राज्यसभा निवडणुकीनिमित्त होणाऱ्या आकड्यांच्या खेळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कोंडी करण्यासाठी भाजपनं नवी खेळी खेळली होती. ऐनवेळी राज्यसभेसाठी भाजपनं चौथा उमेदवार म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना संधी दिली होती.

विजया रहाटकर आखाड्यात उतरल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली होती. राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला 48 मतं मिळवणं आवश्यक आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडे पक्षाच्या संख्याबळानुसार अपुरी मतं होती. त्यामुळे विजया रहाटकर यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसला असता.

मात्र आज अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती आणि विजया रहाटकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याय. रहाटकरांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जीव भांड्यात पडलाय. आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे याचा सर्वात जास्त फायदा हा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना होणार आहे. एकाप्रकारे कुमार केतकर यांच्या राज्यसभेचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

भाजपाकडून प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, नारायण राणे तर शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरलाय. तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीकडून वंदना देसाई यांनी अर्ज भरलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 15, 2018 02:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading