राज ठाकरे करणार फेसबुक पेज लाँच

राज ठाकरे करणार फेसबुक पेज लाँच

राज ठाकरे यांच्या नावाने फेसबुक ट्विटरवर आधीच अनेक बनावट अकाऊंट असले तरी यावेळी मात्र राज ठाकरे स्वत: हे पेज लाँच करणार आहेत.

  • Share this:

प्रणाली कापसे, मुंबई, 20 सप्टेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे २१ सप्टेंबरला फेसबुक पेज लाँच करणार आहेत. त्यासाठी सगळी तयारी झाली असून रविंद्रनाट्य मंदिर इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राज ठाकरे यांच्या नावाने फेसबुक ट्विटरवर आधीच अनेक बनावट अकाऊंट असले तरी यावेळी मात्र राज ठाकरे स्वत: हे पेज लाँच करणार आहेत.

राज ठाकरेंच्या फेसबुक पेजच्या प्रचारासाठी हे टिझर तयार करण्यात आलय. २१ सप्टेंबरला मोठा कार्यक्रम आयोजित करुन राज ठाकरे फेसबुक पेज लाँच करणार आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर अजिबात सोशल नसलेले राज ठाकरे याच पेजला प्रचाराचं, स्वत:ची मतं मांडण्यासाठीचं, सरकारवर टीका करण्यासाठीचं हत्यार म्हणून वापरणार आहेत.

मागील निवडणुकांमधील सततच्या पराभवानंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षाची मोट बांधायला सुरुवात केलीय. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणून या फेसबुक पेजचा वापर केला जाणार आहे. गेल्या काही वर्षात सोशल मीडिया हे प्रचार, प्रसाराचं महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून पुढे येत असलं तरी अनेक नेते वैयक्तिकरित्या फेसबुकला केवळ गंमत जमत करण्याचं माध्यम म्हणून पहातात.

नुकतीच मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबत आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज ठाकरे फेसबुकवर आल्यावर त्यांच्यावर टिका करणाऱ्याला कशा पद्धतीनं हाताळलं जातं हे पहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2017 08:26 PM IST

ताज्या बातम्या