मोदींनी देश खड्ड्यात टाकला - राज ठाकरे

मोदींनी देश खड्ड्यात टाकला - राज ठाकरे

मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सच्या परिसरातले फेरीवाले 15 दिवसांत हटवले पाहिजे, असा दम राज ठाकरेंनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला. मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेच्या मुख्यलयावर धडकला आणि राज अधिकाऱ्यांना भेटले.

  • Share this:

मुंबई, 5 ऑक्टोबर : मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सच्या परिसरातले फेरीवाले 15 दिवसांत हटवले पाहिजे, असा दम राज ठाकरेंनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.. माझा पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही, रेल्वेनं काय ते समजावं, असंही राज म्हणाले. मनसेचा मोर्चा पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर धडकला आणि राज अधिकाऱ्यांना भेटले.

बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून पुन्हा राज ठाकरेंनी मोदींना लक्ष केलं. मराठी माणसानं काय ढोकळा खाण्यासाठी अहमदाबादला जायचं का, त्याच्यापेक्षा चांगला ढोकळा मुंबईत मिळतो, असं त्यांच्या खास शैलीत राज म्हणाले.मोदींच्या नादाला लागू नका, मोदींनी देश खड्ड्यात नेलाय, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

राज ठाकरेंच्या भाषणातले मुद्दे

15 दिवसांच्या आत फेरीवाले हटवा नाहीतर मनसेचे कार्यकर्ते त्यांची हकालपट्टी करतील

किड्या मुंग्यांसारखी माणसं मरतात आणि यांच्या उच्चस्तरीय बैठका होतात

आधीही तेच होतं आजही तेच आहे सरकार बदलून फायदा नाही महिलांसाठी विशेष गाड्या वाढवा

देशानं तुमच्यावर विश्वास टाकला बहुमत दिलं, अच्छे दिनचं आश्वासन दिलं काय झालं अच्छे दिन

तुम्ही लोकांना सांगितले अच्छे दिन आयेंगे - परदेशातून आणून 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकणार होते - मात्र नंतर अमित शाह म्हणतात ये तो एक जुमला था

मोदींच्या भाषणांच्या जुन्या क्लिप्स बाहेर निघत आहेत आणि आता त्यांना दु:ख होतं माणसं बदलून फायदा नाही

मंदी आणखी 5,6 महिने राहणार असं आरबीआयनं सांगितलं

सुरेश प्रभु यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला त्यांना पदावरून काढून टाकलं - प्रभुंना काढून आपल्या विश्वासू माणूस पियुष गोयलला आणलं

गुजरातचा मुंबईवर डोळा आहे

फक्त मुठभर लोकांसाठीच बुलेट ट्रेन, बुलेट ट्रेनने जावून काय फक्त ढोकळा खायचा का?

एवढं खोटं बोलणारा पंतप्रधान याआधी बघितला नाही

विकास वेडा झाला हे भाजपच्याच माणसांनी पसरवलं

जीएसटीने सगळेच हैराण मोदींनी देश खड्डा नेला

सुधारणा झाल्या नाही तर पुढचा मोर्चा शांततेत असणार नाही राज ठाकरेंनी दिला इशारा

आपलं भाषण झाल्यावर राज ठाकरे आणि मोर्चेकरांनी दोन मिनिटं उभं राहून एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 09:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading