उद्धवच्या नीच राजकारणाचा कंटाळा आलाय- राज ठाकरे

हे नगरसेवक मीच दिले अशीही अफवा पसरवताहेत असलं राजकारण मी करत नाही, करणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2017 02:42 PM IST

उद्धवच्या नीच राजकारणाचा कंटाळा आलाय- राज ठाकरे

15 आॅक्टोबर : शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यामुळे मनसेच्या गोटात खळबळ उडाली. दोन दिवस यावर उलटसुलट चर्चा सुरू होती. या सगळ्यावर बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, उद्धव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय नीच राजकारण केलं हे मी कधीच विसरणार नाही, महाराष्ट्रातली जनताही विसरणार नाही, असा थेट आरोप त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

उद्धवच्या नीच राजकारणाचा कंटाळा आलाय, असंही ते म्हणाले. हे नगरसेवक मीच दिले अशीही अफवा पसरवताहेत असलं राजकारण मी करत नाही, करणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे -

 • हा प्रकार महाराष्ट्रातल्या लोकांना आवडला नाही
 • Loading...

 • हे नगरसेवक मीच दिले अशीही अफवा पसरवताहेत असलं राजकारण मी करत नाही, करणार नाही
 • शिवसेनेतून बाहेर पडताना मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो
 • उद्धवच्या नीच राजकारणाचा कंटाळा
 • मी फोडा फोडीचं राजकारण केलं नाही असलं घाणेरडं राजकारण मी करत नाही
 • बाळासाहेबांनी हे शिकवलं नाही
 • दोन द्यावेत, दोन घ्यावेत असं मी करतो
 • नगरसेवकांना पाच, पाच कोटी दिले
 • लोकं विश्वासानं माणसं निवडून देतात हा लोकांचा विश्वासघात
 • फुटलेले नगरसेवक दळभद्रीच
 • महिनाभर आधीच कुणकूण होती
 • महाराष्ट्राचं राजकारण उमदं असावं
 • पवारांनी फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल बोलू नये
 • या नगरसेवकांना चार,पाच वेळा समजून सांगितलं जे लोक बुद्धीनंच भ्रष्ट झाले त्यांना काय सांगणार
 • आता टाळीचा विषयच नाही आता गालावर टाळी
 • शिवसेनेकडून ही अपेक्षा नव्हती, भाजप काय करतो, ते माहीत नाही

पाहा राज ठाकरेंची पूर्ण पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...