मल्टिप्लेक्सच्या मालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट, माघार घेण्यास मनसेचा नकार

मल्टिप्लेक्सच्या मालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट, माघार घेण्यास मनसेचा नकार

मल्टिप्लेक्स सिनेमागृहात मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांविरोधात मनसेनं आंदोलन पुकारलं होतं. त्या आंदोलनानंतर आज मल्टिप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : मल्टिप्लेक्स सिनेमागृहात मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांविरोधात मनसेनं आंदोलन पुकारलं होतं. त्या आंदोलनानंतर आज मल्टिप्लेक्स चालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत मल्टिप्लेक्सच्या मालकांनी मनसेनं केलेल्या आंदोलनाविरोधात राज ठाकरेंशी चर्चा केली.

यावेळी माघार घेण्यास मनसेनं मात्र नकार दिलाय. तर सगळ्या मल्टिप्लेक्सला दोन ते तीन दिवसांत आदेश दिले जातील असंही सांगण्यात आलंय. तसं  न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय.

याबद्दल बोलताना मनसे नेते अमेय खोपकर म्हणाले, ' राज्यातील सगळ्या मल्टीप्लेक्सचे सीईओ राज ठाकरेंना भेटलेत. महागड्या खाद्यपदार्थावर तोडगा निघणार आहे. पाण्याची बाटली, चहा-कॉफी, वडा-समोसा आणि पॉपकॉर्नचे दर ५०रुपयांच्या आत असतील. याबाबतचे सगळ्या मल्टीप्लेक्सला दोन-तीन दिवसात आदेश दिले जातील.तसं नाही झाल्यास पुन्हा आंदोलन करू.

मध्यंतरी मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही? 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला ?, असा सवाल करत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलं होतं.

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका मल्टिप्लेक्समध्ये मनसे कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2018 03:09 PM IST

ताज्या बातम्या