राज ठाकरेंच्या फेसबुक पेजने मोडले सर्व रेकॉर्ड;एकाच दिवसात पाच लाख लाईक

राज ठाकरेंच्या फेसबुक पेजने मोडले सर्व रेकॉर्ड;एकाच दिवसात पाच लाख लाईक

या पेजला एकाच दिवसात तब्बल पाच लाखाहून अधिक लाईक्स आणि फॉलोअर्स मिळाले आहेत.

  • Share this:

मुंबई,22 सप्टेंबर: राज ठाकरेंनी काल लाँच केलेल्या फेसबुक पेजने एकाच दिवसात सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या पेजला एकाच दिवसात तब्बल पाच लाखाहून अधिक लाईक्स आणि फॉलोअर्स मिळाले आहेत.

राज ठाकरे यांनी काल त्यांचं पेज लाँच केलं होतं. पेजच्या उद्घाटनाच्या भाषणाला एकाच दिवसात 2 लाख 60 हजार हिट्स मिळाले आहेत. या पेजवरून महिन्यात एकदा तरी फेसबुक लाईव्ह राज ठाकरे करणार आहेत. लोकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी फेसबुकवर एन्ट्री केली आहे. त्यांचं पेज एकाच दिवसात व्हेरिफाईडही झालंय. एका दिवसात इतकी प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यामुळे आता या पेजवरून राज ठाकरे सामान्यांशी किती प्रभावी संवाद साधतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.तसंच या पेजचा मनसेला किती फायदा होतो हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published: September 22, 2017, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading