या सरकारच्या हातून काहीच होणार नाही-राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

या सरकारच्या हातून काहीच होणार नाही-राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

या सरकारच्या हातून काहीच होणार नाही. तुमचा वापर फक्त निवडणुकीपुरताच केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आंदोलन करा.

  • Share this:

 11 मार्च: या सरकारच्या हातून तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाही असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. नाशिकहून 180 किं.मीचा प्रवास करत  शेतकरी मोर्चा घेऊन मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांशी राज ठाकरे   यांनी सोमय्या मैदानावर संवाद साधला.

या सरकारच्या हातून काहीच होणार नाही. तुमचा वापर फक्त निवडणुकीपुरताच केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आंदोलन करा. मोर्चे काढा. पण मोर्चात चालत असताना पायातलं रक्त विसरू नका. तुमचा हा रागच तुमची लढाई तडीस नेईल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे. दुसऱ्यांच्या आंदोलनाला स्वत:चं आंदोलनं  म्हणणं मला मान्य नाही. तेव्हा मी तुम्हाला दर्शन द्यायला आलोय असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. कधीही हाक द्या मी मदतीस धावून येईन असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आता यापुढे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात की चिघळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: March 11, 2018, 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading