...आणि मोदींनाच घेऊन दाऊद आला, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून 'फटकारे'

या व्यंगचित्रात कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम मोदींना खेचत असल्याचं दिसत आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2017 11:23 AM IST

...आणि मोदींनाच घेऊन दाऊद आला, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून 'फटकारे'

मुंबई,24 सप्टेंबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. फेसबुक पेजच्या लाँचिंग दरम्यान मोदी आणि दाऊदबाबत केलेलं वक्तव्य राज ठाकरे यांनी कार्टूनच्या माध्यमातून रेखाटलं आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी फेसबुकवर एन्ट्री घेतली आहे. त्यांच्या पेजला तब्बल 5 लाख लोकांनी लाईक केलं आहे.या पेजवर त्यांनी आतापर्यंत दोन पोस्ट टाकल्या आहेत. आपण या फेसबुक पेजवर व्यंगचित्र शेअर करणार असल्याचं त्यांनी आधीच सांगितलं होतं. त्यांनी शेअर केलेल्या या व्यंगचित्रात कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम मोदींना खेचत असल्याचं दिसत आहे.

मात्र दाऊदला मी खेचून आणल्याचं मोदी इतरांना सांगत आहेत.  दाऊदला पकडण्याचं श्रेय भाजप लाटणार असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता.तेच दाखवणारं व्यंगचित्र त्यांनी शेअर केलं आहे.गंमत म्हणजे 3000 हून अधिक लोकांनी या व्यंगचित्र  फेसबुकवर शेअर केलंय तर 50हजारहून लोकांनी लाईक केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2017 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...