राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट;डोंबिवलीच्या विकासावर चर्चा

राज ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट;डोंबिवलीच्या विकासावर चर्चा

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्च होईल अशी चर्चा होती . पण मुळात बैठकीत त्यावर चर्चा झाली नाही. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यानुसार डोंबिवलीच्या विकासासंदर्भात त्यांच्यात बैठक झाल्याची.

  • Share this:

मुंबई,02 नोव्हेंबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं आधीच राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं.

आज दुपारी 12च्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर पोचले.त्यानंतर जवळपास एक सव्वा तास त्यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षावर बैठक झाली. गिरीष महाजनही या बैठकीला उपस्थित होते. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्च होईल अशी चर्चा होती . पण मुळात बैठकीत त्यावर चर्चा झाली नाही. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यानुसार डोंबिवलीच्या विकासासंदर्भात त्यांच्यात बैठक झाल्याची. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांचीही भेट घेतली होती. तसंच राज्यात स्टार्ट अप इंडियाची पॉलिसी ठरलेली नाही , तरुण उद्योजकांना संधी मिळालेली नाही , डोंबिवलीत जुन्या इमारतींचा प्रश्न सोडवा या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली.

आता या बैठकीतून मुंबईच्या  राजकारणाला काही वळण मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: November 2, 2017, 2:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading