Elec-widget

गणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन

गणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन

मी गिरगावातल्या गणेश मंडळांना बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा असं सांगितलंय.

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : मी गिरगावातल्या गणेश मंडळांना बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा असं सांगितलंय. दरवेळी आमचे सण आले की बंधनांच्या गोष्टी कशा काय सुरू होतात ? असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गिरगावच्या गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याची परवाणगी दिली आहे. कोर्ट नेमकं आमच्या सणांच्या वेळेस आदेश कसं काय देतं ? एरवी मशिदींमध्ये बांग देण्याची स्पर्धा सुरु असते तेव्हा आक्षेप का नाही ? गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आम्ही कायदेशीर मार्गदर्शन करणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेनं मंडळांना परवानगी नाकारलीय. त्यामुळे शिवसेनेला आव्हान देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता मैदानात उतरले. ते आज गिरगावच्या खेतवाडीत गेले होते.  दक्षिण मुंबईतील गणेशोत्सवातील मंडपांचा प्रश्न सोडवण्यासाठी ते कार्यकर्त्यांना भेटले आणि त्यांच्याशी चर्चा केली. यात बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा असे आदेश राज ठाकरे यांनी मंडळांना दिले आहे.

शाहरुखच्या लेकीनं केलं पहिलंवहिलं मॅगझिन शूट!

मंडपांसाठी मुंबई मनपा परवानगी देत नसल्याची तक्रार देत गणेश मंडळं राज ठाकरे यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले होते. त्यावर राज ठाकरे यांनी दणक्यात गणेशोत्सव साजरा करा असा आदेश दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पादचारी आणि वाहतूकीला अडथळा होणार नाही, अशी भूमिका पालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी घेतली आहे. त्यामुळे आकर्षक आणि सगळ्यात मोठ्या सजावटीसाठी प्रसिद्ध असलेल्या मुबंई गिरगावच्या खेतवाडीत भागात मंडपाबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. जर मंडप लहान स्वरूपाचे बांधायचे तर मग गणेश मुर्त्या कशा आणायच्या असा प्रश्न इथल्या मंजडळांना पडला होता. पण आता राज ठाकरे यांच्या आदेशामुळे मंडळांना दिलासा मिळाला आहे.

Loading...

हेही वाचा...

VIDEO : सेल्फीच्या नादत 50 फूट खाली कोसळला, तुटलं कंबरेचं हाड

पुण्याचा वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर अखेर पुणे पोलिसांना शरण

VIDEO : मराठा आरक्षणासाठी तरुण महावितरण टॉवरच्या टोकावर बसले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...