S M L

जे पेराल तेच उगवेल-राज ठाकरेंची फेसबुक पेजवरून भाजपवर टीका

सोशल मीडियावर मत व्यक्त करण्यासाठी गेल्या आठवड्यात अनेकांना नोटिस बजावण्यात आल्या होत्या. त्याचा निषेध करणारी पोस्ट आज राज ठाकरेंनी केली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 27, 2017 09:19 AM IST

जे पेराल तेच उगवेल-राज ठाकरेंची फेसबुक पेजवरून भाजपवर टीका

मुंबई,27 सप्टेंबर: राज ठाकरे यांनी फेसबुक पेजवरुन भाजपवर चांगलीच टीका केली आहे. मोदी-दाऊद प्रकरणावर टीका केल्यानंतर आता सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेवर भाष्य करणारी पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे.

सोशल मीडियावर मत व्यक्त करण्यासाठी गेल्या आठवड्यात अनेकांना नोटिस बजावण्यात आल्या होत्या. त्याचा निषेध करणारी पोस्ट आज राज ठाकरेंनी केली आहे. जे पेराल तेच उगवेल असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर बोचरी टीकासुद्धा केली आहे. ज्यांना नोटिस आल्या त्यांनी माझ्याशी संपर्क साधा आपण बघू काय करता येईल ते करू असं म्हणत नोटीस बजावणाऱ्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न त्यांनी  केलाय.

फेसबुकवरून लोकांशी संवाद साधता यावा म्हणून काही दिवसांपूर्वी या फेसबुक पेजचे लाँचिग केलं आहे. या पेजवरून त्यांची मत व्यक्त करण्यासोबत राज ठाकरे  या पेजवरून व्यंगचित्रांच्या माध्यमातूनही व्यक्त होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 09:19 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close