Home /News /mumbai /

'...जेव्हा बाळासाहेब लुंगीवर मातोश्रीबाहेर पडतात', राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

'...जेव्हा बाळासाहेब लुंगीवर मातोश्रीबाहेर पडतात', राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

    ठाणे, 1 मार्च : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले एक मोठे नेते होते. गेल्या 50 वर्षांच्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातला असा एकाही राजकीय पक्षाचा एकही नेता नाही ज्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली कार्टून, त्यांचे राजकीय डावपेच,त्यांची कलासक्त वृत्ती, जाहीर सभांच्यामधली त्यांची भाषणं यांची मोठी मोहीनी आजही राज्यातल्या तरुणाईवर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंगाच्या, घटनांच्या मागच्या कथा ऐकायला कोणाला नाही आवडणार. असाच एक घरगुती प्रसंग रविवारी महाराष्ट्राला कळला. ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये राज ठाकरे यांच्या मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी सांगितला. जो आजपर्यंत कोणालाच माहीत नव्हता. कलासंगम या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक, पत्रकार अंबरिष मिश्र यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखत घेतली. काय म्हणाले राज ठाकरे? राजकारणातले आणि राजकारणापलिकडचे राज ठाकरे कलासंगमच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला पहायला आणि ऐकायला मिळाले. राजकारण, समाजकारण, चित्रपट, दिग्दर्शन, चित्रकला अशा अनेक विषयांवर राज ठाकरे यांनी अतीशय मनमोकळी मुलाखत दिली. राष्ट्रपुरुषांना जातींची लेबलं लावणाऱ्या राजकारण्यांचं नाव न घेता राज ठाकरे यांनी थेट आसूड ओढले. पण या गप्पांच्या ओघात राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची अशी एक आठवण सांगितली, ज्यामुळे राज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातल्या अनोख्या प्रेमाचा आणकी एक पदर उलगडला गेला. ऐका राज ठाकरे यांच्याच शब्दात.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Raj Thackeray

    पुढील बातम्या