24 तासात तूर खरेदी सुरू करा अन्यथा..,राज ठाकरेंचा इशारा

24 तासात तूर खरेदी सुरू करा अन्यथा..,राज ठाकरेंचा इशारा

सरकारनं सर्व तूर खरेदी केंद्रं येत्या २४ तासात सुरू करावीत आणि शेतकरी घेऊन आलेली सर्व तूर ताबडतोब सरकारने अगोदर जाहीर केलेल्या हमीभावाने खरेदी करावी

  • Share this:

24 एप्रिल : सरकारनं सर्व तूर खरेदी केंद्रं येत्या २४ तासात सुरू करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना राज्य भर आंदोलन करेल असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.

तूर खरेदी थांबल्यामुळे बळीराजा हैराण झालाय. त्यातच आज केंद्रानेही हात झटकल्यामुळे तूर विकायची कशी ? असा पेच प्रसंग शेतकऱ्यांपुढे उभा ठाकलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्ध करून तूर खरेदीवरुन राज्य सरकारला आता इशारा दिलाय.

महाराष्ट्र सरकारने ह्यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्र सुरू केली. परंतु पहिल्यापासूनच त्यात अनेक गोंधळ घातले. कधी म्हणाले गोदामात जागा शिल्लक नाही, कधी बारदाना उपलब्ध नाही म्हणाले तर कधी वजनकाटे नसल्याचं कारण सांगितलं गेलं आणि बरीच खरेदी केंद्रं सतत बंदच ठेवण्यात आली. शेतकरी तूर घेऊन आले पण त्यांना ताटकळत ठेवण्यात आलं. ह्यातून सरकारचा उद्देश स्पष्ट समोर आला आहे असं या पत्रकात म्हटलंय.

तसंच आज मात्र सरकार फसवणूक करत आहे आणि लाखो क्विंटल तूर प्रत्येक खरेदी केंद्रावर शिल्लक असतानाही ही खरेदी केंद्र बंद केली जात आहेत. सरकारनं सर्व तूर खरेदी केंद्रं येत्या २४ तासात सुरू करावीत आणि शेतकरी घेऊन आलेली सर्व तूर ताबडतोब सरकारने अगोदर जाहीर केलेल्या हमीभावाने खरेदी करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपूर्ण राज्यभर आंदोलन करावं लागेल असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 10:37 PM IST

ताज्या बातम्या