मराठा मोर्चात आलेले 98 टक्के लोकं भाबडे होते -राज ठाकरे

मराठा मोर्चात आलेले 98 टक्के लोकं भाबडे होते -राज ठाकरे

आधी डोळा तर मारु द्या मग पाहू असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टाळीसाठी हात पुढे केलाय.

  • Share this:

01 सप्टेंबर : 98 टक्के मराठा मोर्चात आलेले लोक भाबडे होते, बाकीच्या लोकांना राजकारण करायचं आहे, त्यात भाजपही मागे नाही अशी टीका मनसेचे अध्यक्ष  राज ठाकरेंनी केली. तसंच मोदींनी चुकीचे पायंडे पाडू नये, पुढे येणारे अजून दुप्पटीने सुड उगवतील असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

ब्राम्हण सेवा मंडळाच्या दादर इथल्या गणेशोत्सवात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात यावेळी राज ठाकरेंची तोफ चौफेर धडाडली.

"आधी डोळा तर मारु द्या"

मधल्या काळातल्या विश्रांतीला माझे वैयक्तिक कारणं होती. मुलगा आजारी होता आता तो आता चांगला आहे. फीट आहे. मध्यंतरी टाळी वैगेरे झालं. पण काही घडलं नाही. पुढे विचारलं तर बघू, आधी डोळा तर मारु द्या मग पाहू असं म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा टाळीसाठी हात  पुढे केलाय.

"बीएमसी काम करत नाही"

महापालिका स्वतःचं काम करत नाहीये आणि इतर ही एजन्सी पण काम करत नाहीये. शहराच्या एकूण क्षेत्रफळानुसार १५ टक्के रस्ते असावे. पुण्यात किती तर फक्त ७ टक्के आहे.  मुंबईत फायरब्रिगेडच्या बंब आत जातील असे रस्ते नाहीत. आहे ते चांगलं करा मग काही नव्या गोष्टी करा. हा सगळ्याच शहरांचा मुद्दा आहे. ठाण्यात सात महापालिका झाल्या याचा अर्थ लोकसंख्या वाढली आहे. मुख्यमंत्री सांगतात मी दत्तक घेतो. सहा हजार कोटी देतो म्हणतात. पैसे आहेत कुठे ? अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

"मेट्रो कुणासाठी ?"

सगळ्या एजन्सीची एकत्रित बैठक होतं नाही. कुणी काय करावंचयाचा ताळमेळ नाही. पाणी साचेपर्यंत आपल्याला काही आठवत नाही. मेट्रो कुणासाठी करत आहेत. आम्हाला आधी गरज वाटली नाही. आता बाहेरून पडणाऱ्या भरीसाठी आपण हे करतोय का ? असा सवाल विचारत राज ठाकरेंनी भुयारी मेट्रोला विरोध दर्शवला.

"आरक्षणालाच विरोध"

माझा आरक्षणालाच विरोध आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना आरक्षण दिलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे. या महाराष्ट्रात ज्या नोकऱ्या तयार होतील त्या इथल्या लोकांना द्या आरक्षणाची गरज नाही. इतर राज्यात होतं ते महाराष्ट्रात का होत नाही असं परखड मतही राज ठाकरेंनी व्यक्त केला.

"मराठा मोर्च्याचा सगळ्यांची फायदा उचचला"

मराठा मोर्च्यात आलेले ९८ टक्के लोक भाबडे होते. त्यांच्या सगळ्यांची फायदा घेतला. त्यात शरद पवारांपासून सगळेच होते. त्यात भाजप पण आहेच. मी माझ्या पक्षात जात पहात नाही. जेंव्हा जातीचं आरक्षण पडतं तेव्हा जात पहावी लागते अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

"...म्हणून भागवतांना भेटलो"

मी भागवतांना भेटलो त्याची कारणं वेगळी होती. मराठी शाळांची संस्कृती ही वेगळी आहे. ज्या शाळा अल्पसंख्यांक मुलांना बळजबरी घेतात. सरस्वती वंदना करताना बाहेर उभे असतात. अशा शाळांमध्ये बळजबरीनं करणं योग्य नाही असंही राज ठाकरे म्हणाले.

"ज्याला जे खायचंय ते खावू द्या"

मला कळत नाही की तुमच्या पर्यूषणाला कत्तलखाना बंद का ठेवावा. ज्याला जे खायचंय ते खावू द्या. तुम्हाला तुमच्या धर्मात काय करावं कुणी सांगत नाही. मग तुम्ही दुसऱ्यांना का सांगतात.  कोकणातली लोकं श्रावण पाळतात. पण ते काही जोरजबरदस्ती करत नाही अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

"राहुल गांधी आहेत तोपर्यंत भाजप राजकीयदृष्ट्या जिवंत"

जोपर्यंत राजकीयदृष्ट्या राहुल गांधी जिवंत आहेत. तोपर्यंत भाजप राजकीयदृष्ट्या जिवंत आहे. नरेंद्र मोदींवर अजूनही लोकांचा विश्वास आहे. परिवर्तन हे होतंच राहतं. प्रत्येक पक्ष स्वतःची सत्ता राखण्याचा प्रयत्न करतो. आपली सत्ता टिकवण्यासाठी आपण चुकीचा पायंडा पडायला नको. आज मोदी आहेत. त्यांनी चुकीचे पायंडे पाडू नये. पुढे येणारे अजून दुप्पटीने सुड उगवतील. कुणी कुणाचं ऐकून घेत नाही. त्यांना इंदिरा गांधी पटलेल्या दिसतात. दुसऱ्यांना संपवण्यासाठी जगायला नको असा टोलाही त्यांनी लगावला.

"चळवळ कशाला लागते"

प्रत्येक गोष्टीत चळवळ कशाला लागते. प्रत्येक गोष्टीत चमच्यानं भरवायला कशाला पाहिजे. काही गोष्टी अंगी असाव्यात लागतात. निवडणूक आली की हे सगळे किरीट सोमय्या बोलतात. आता भाजपला मतदान होतं. तेंव्हा ईव्हीएम मशीन बद्दल का बोलत नाही असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

"महाराष्ट्र माझ्या हाती मिळो"

वर्तमान पत्र चालवणं म्हणजे पांढरा हत्ती आहे. फेसबूक फुकट आहे. वापरून बघू. मला जे महाराष्ट्रासाठी जे करता येईल ते मी करेन. आणि करत राहणार आहे. खडतर काळ प्रत्येक पक्षाला बघावा लागतो. तसा प्रत्येकाच्या नशिबी असतोच. मी परमेश्वराकडे मागतो की हा महाराष्ट्र माझ्या हाती मिळो आणि हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडो अशी इच्छाही राज ठाकरेंनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 10:24 PM IST

ताज्या बातम्या